माता-भगिनींचे रक्षण आणि आदर करणे हे आपले कर्तव्य – आमदार चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी – mkm news 24 –महीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सडक अर्जुनी तर्फे आयोजित *रक्षाबंधन* सोहळा दिनांक ११/०८/२०२२ एरिया 51 कोहमारा येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. मनोहर चंद्रिकापुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला भगिनींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
महीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सडक अर्जुनी तर्फे आयोजित कार्यक्रमादरम्यान.
अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना सडक अर्जुनी तालुक्यातील उपस्थित सर्व महिला भगिनींनी आमदारांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदारांनी कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या महिला भगिनींना प्रत्येकी एक साडी भेट म्हणून दिली. याप्रसंगी ते म्हणाले की, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व माता-भगिनींचे रक्षण आणि आदर करणे हे आपले कर्तव्य असून आपण सदैव तत्पर राहू.हातावर राखी बांधलेल्या महिलांचे रक्षण करणे ही आता आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतीय संविधानामुळे महिला स्वत:ला सुरक्षित समजू लागल्या आहेत. सविधनांने महिलांना अनेक सवलतीही दिल्या आहेत. रक्षाबंधन हा सन भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढच्या रांगेत उभ्या असलेल्या दिसतात. यावेळी महिलांना आमदारांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका राकाँप अध्यक्ष डॉ. अविनाशजी काशीवार, नगरध्यक्ष सडक/अ.न.प तेजरामजी मडावी,माजी जि. प सदस्य रमेशजी चु-हे, रजनीताई गि-हेपुंजे अध्यक्ष तालुका महीला राष्ट्रवादी काँग्रेस, सडक/अ. न.प उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, सभापति कामिनीताई कोवे, नगरसेवक तेवचंदजी तरोने, नगरसेविका दीक्षाताई भगत,नगरसेविका शाहिस्ता शेख, प. स सदस्य डॉ.रुखीरामजी वाढई, प्रा. मंजुताई चंद्रिकापुरे, दिनेश कोरे, भुंगराज परशुरामकर, उद्धवराव परशुरामकर, राजकुमार भगत, फारुक शेख, मंजुताई डोंगरवार, अनीताताई बांबोडे, इंदुताई परशुरामकर, पुष्पाताई बडोले, रेखाताई कोसरकर, छायाताई टेकाम, शुभांगीताई वाढवे, क्रिष्णाताई कोरे,शमी शेख, रोषणीताई सारंगपुरे, स्विटीताई यावलकर, प्रमिळताई बडवाईक, पुष्पाताई गुप्ता , उषा ताई होळकर, आनंदाताई निखारे, रमाताई कोरे, गुंवंताताई कापगते,
रीनाताई यावलकर, माधव तरोने,गोवर्धन नेवारे, उमेश उदापुरे,करुणाताई गेडाम, उत्तराताई, पुष्पाताई चौधरी महानंदाताई चुटे, माधुरीताई तागडे, छायाताई कुरसुंगे, सरिताताई तरोने, ज्योतीताई राऊत, वनिताताई भोयर, गीतमंगलाताई बोकडे, तसेच तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.