Monday, May 12, 2025
अर्जुनी मोर

वनपरिक्षेत्र नवेगाव पार्क येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन

MKM NEWS 24 –
अर्जुनी मोरगाव –तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रा अंतर्गत नवेगाव राष्ट्रीय उद्यान वनपरिक्षेत्रात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याची सुरुवात 13 ऑगस्ट रोजी सकाळी श्री सचिन डोंगरवार व प अ पार्क यांचे हस्ते कार्यालयातील ध्वजारोहण करून करण्यात आली.

त्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक श्री जयरामे गौडा आर. व उपसंचालक श्री पवन जेफ यांचे मार्गदर्शनात वनक्षेत्रालगत असलेल्या खोली,झोडेटोली, परसोडी,खोबा, कोकणा,चिखली,बकी, मेंढकी या गावात तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्ती पर घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली, दरम्यान विविध गावात ग्रामविकास परिस्तितिकीय समितीचे पदाधिकारी यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करून त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच कोकणा येथील जी .प.शाळेत पंचायत समिती सदस्य श्री शिवाजी गहाणे व सरपंच श्री अमरदिप रोकडे तसेच मुख्याध्यापिका कु. काळसरपे यांचे हस्ते वृक्षारोपण करून शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगण्यात आले. कोसबी येथील वनकार्यालयात ग्रामपरिस्तिकीय समिती अध्यक्ष श्री ईश्वर गहाणे व श्री विलास मेश्राम तसेच पत्रकारबंधू श्री राजेश मुनिश्वर व भामा चुर्हे यांचे हस्ते वृक्षारोपण करून तसेच सर्वांचे आभार मानून रॅलीचे समारोप करण्यात आले.

रॅलीमध्ये वनपरिक्षेत्र नवेगाव पार्क, स्वागत व विशेष व्याघ्र संरक्षण दल नवेगाव बांध च्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

error: Content is protected !!