गोंदिया जिल्ह्यातून राज कॉम्प्युटर सडक अर्जुनी च्या विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय व तृतीय बक्षीस
गोंदिया/ सडक अर्जुनी – MKM news 24 –महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगा टक्के बक्षीस पक्के बोर्डाच्या परीक्षेत तुमच्या मार्काचा अंदाज सांगा आणि बक्षीस जिंका अशी स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये राज काँम्प्युटर सडक अर्जुनी येथील एम एस सी आय टी शिकणाऱ्या विद्यार्थिनी कु. युती प्रदीप मुनिश्वर द्वितीय व कु.मीनल चुन्नीलाल जनबंधू तृतीय क्रमांक पटकाविला.
त्यामुळे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे च्या वतीने कु. युती प्रदीप मुनिश्वर १०००/- रुपयांच्या धनादेश व कु.मीनल चुन्नीलाल जनबंधू ५००/- रुपयांच्या धनादेश देऊन *राज काँम्प्युटरचे संचालक राजेश कठाणे* यांनी अभिनंदन केले तसेच सोबत शिक्षक कुणाल बडोले व तनिषा अग्रवाल, सानिया बडोले, प्रतिक्षा चांदेवार, मोनाली हेमने, डिंपल जनबंधू, तनवी जनबंधू, अविनाश लांजेवार, लिनीका लांजेवार, गुंजन मेश्राम, काजल मुंगुलमारे,कुंदन मुंगुलमारे, सारा नागदेवे, वैष्णवी प्रधान,सृष्टी रोकडे, साहिल सोनवणे, दिपाली सूर्यवंशी, लिखित उके, हीना अंबादे, पूजा मेश्राम या सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.