Thursday, December 11, 2025
सड़क अर्जुनी

आमदार चंद्रिकापुरे यांनी पूर परिस्थिती चा घेतला आढावा

सडक अर्जुनी: गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सर्वत्र पूर परिस्थिती आहे. पावसाचे पाणी गावांत व गोड्यात शिरले आहे. त्यामुळे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी १५ ऑगस्ट ला सडक अर्जुनी तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या दौरा करून. एरिया 51 कोहमारा येथे तालुक्यातील यंत्रणाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत तहसीलदार किशोर बागडे, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, गट विकास अधिकारी डॉ. श्रीकांत वाघाये, तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे,
तालुका आरोग्य अधिकारी, डॉ भुते, उपअभियंता शिंदे, डॉ.अविनाश कशीवार उपस्थित होते.

तालुक्‍यांमध्‍ये पुरस्थिती गंभीर आहे.पुरग्रस्त भागात असलेल्‍या नागरिकांना भेटून त्‍यांच्‍या समस्‍या समजून घ्या अधिकारी यांना त्‍यावर त्‍वरीत उपाययोजना करण्‍यास सांगीतले. नागरिकांच्‍या समस्‍यांकडे गांभीर्याने लक्ष देवून त्‍यांना योग्‍य ती मदत करावी, असे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे दिले.अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. ज्‍यांच्‍या घरात पुराचे पाणी गेले आहे अशा कुटूंबांना ताबडतोब मदत करण्‍याचे निर्देशही त्यांनी दिले. तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तयार करून शासनास पाठविण्याचे आदेश देण्यात यावे.

error: Content is protected !!