राजस्थान मधील दलीत विद्यार्थी हत्या प्रकरणी दोषींवर त्वरित कारवाहीची मागणी करीता बौद्ध समाज बांधव सडक अर्जुनी द्वारे राष्ट्रपतीला निवेदन
राजस्थान मधील दलीत विद्यार्थी हत्या प्रकरणी दोषींवर त्वरित कारवाहीची मागणी करीता बौद्ध समाज बांधव सडक अर्जुनी द्वारे राष्ट्रपतीला निवेदन.
सडक अर्जुनी / गोंदिया – डॉ.सुशील लाडे – राजस्थान मधील जालोर येथील सायल भागातील सुराणा मध्ये सरस्वती विद्यालयातील वर्ग 3 मध्ये शिकणारा विद्यार्थी इंद्रकुमार देवराम मेघवाल याने तहान लागल्याने ठेवलेल्या माठातील पाणी घेतले. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने दलित समाजातील विद्यार्थी ला बेदम मारहान केले.
या घटनेत त्या विद्यार्थी ला आपला जीव गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा सडक अर्जुनी तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने निषेध नोंदविण्यात येत असून या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाही करून न्याय देण्याची मागणी सडक अर्जुनी तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने तालुक्याचे तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना विदेश टेंभुर्ने ,आर.वी.मेश्राम ,डॉ.सुशील लाडे, बिरला गणवीर, प्रा.राजकुमार भगत, भाऊदास जांभूलकर, असलेश अंबादे,राहुल गणवीर, राकेश शहारे, रुपचंद खोब्रागडे, मदन साखरे, वर्षा शहारे, रंजीता मेश्राम, जगदीश सहारे, दिग्रेश टेंभुरने, पुण्यशील कोटांगले, संदेश सहारे, भोजराज रामटेके, बलविर पंचभाई,विनय फुले, त्रिषरण शहारे,सिद्धार्थ शहारे,धम्मदिप शहारे,मनोज रामटेके, अजय क्षिरसागर, आणि इतर बौद्ध समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.