चंद्रिकापुरेंच्या हस्ते अर्जुनी मोर शहरात 5 कोटी विकास कामांचे चे भूमिपूजन
अर्जुनी मोरगाव – MKM news 24 –नगरवासीयांना जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून तुम्हाला नगरसेवक पदाची जबाबदारी दिली. जनतेचा विश्वास सार्थक करण्यासाठी नगरविकासाच्या आराखडा तयार करा.
स्वच्छ सुंदर मुलभुत शहराची ओळख निर्माण करा. राजकारणासोबत समाजकारण करा, सर्वांचे हित जोपासा विकासात्मक कामांसाठी नगरसेवकांनी एकजुटतेने कार्य करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले. दिनांक २१/०८/२०२२ रविवार रोजी अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरध्यक्ष मंजुषा बारसागडे, बांधकाम सभापती संजय पवार, आरोग्य व स्वच्छता सभापती दानेश साखरे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, गटनेता यशकुमार शहारे, नगरसेवक सर्वेश भुतडा, नगरसेवक समीर आरेकर, नगरसेविका दीक्षा शहारे,राकेश जयस्वाल, संजय जयस्वाल, नाना शहारे उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतूद अंतर्गत अर्जुनी नगरपंचायतला पाच कोटी रुपयांच्या विकास निधी मंजूर झाला. या विकास कामांचे भूमिपूजन सोहळा स्थानिक अर्बन बँक चौक येथे पार पाडला.