Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोर

चंद्रिकापुरे यांनी केले अर्जुनी मोरगाव तालुक्यात १.८ कोटी विकासकामांचे भूमिपूजन

अर्जुनी मोरगाव- mkmnews24 – 

अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जूनी मोरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक ०३/०९/२२ केले. यात बाक्टी, सोमलपुर, बिटटोला, कोहलगाव, प्रतापगड, जानवा, आदी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, ३०५४, जिल्हा वार्षिक योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत १.८ कोटी रुपयांच्या रस्ते, नाली, आवरभिंत, अंगणवाडी इमारत या विकासकामांचे भूमिपूजन आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते करण्यात आले.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकास ग्रामीण व दुर्गम भागातील दळणवळणाच्या दृष्टीने रस्त्यांचे मजबुतीकरण व नूतनीकरण आवश्यक असल्याने आमदार चंद्रिकापुरे यांनी यावेळी म्हटले. मागील अनेक दिवसापासून विधानसभा क्षेत्रातील रस्ते व पुलांची अनेक कामे मार्गी लावून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आनलेला आहे व अनेक ठिकाणी कामांना प्रत्येक्ष सुरुवात झालेली आहे. सदर काम पूर्ण होई पर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू राहील असे यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटले. यात प्रामुख्याने रस्ता बांधकामाचे गती वाढवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांना दिल्या.

तसेच कोहलगाव व जानवा ग्रामपंचायत भवनात नागरिकांशी संवाद साधला जनतेला आपल्या समस्या आमदारासमोर उघडपणे मांडण्याचे आवाहन केले, परिसरातील नागरिकांनी आमदार यांच्यासमोर अनेक मागण्या केल्या ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार चंद्रिकापुरे यांनी आपण केलेल्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील असे आश्वासित केले.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जि. प. सदस्य जयश्रीताई देशमुख, पं. स. सदस्य पुष्पलताताई दुर्गकर,पं. स.सदस्य आम्रपालीताई डोंगरवार,, पं. स. सदस्य नाजूक कुंभरे, किशोर ब्राह्मणकर सरपंच जानवा, भोजराज लोगडे सरपंच प्रतापगड, माधुरीताई चांदेवार सरपंच कोहलगाव, भानुदास वडगाये सरपंच बाक्टी, नीलू खुणे सरपंच सोमलपुर, बडवाईक उपसरपंच सोमलपुर, हर्षलाताई राऊत, संध्याताई शेंडे, योगेश जनबंधू, जितेंद्र कापगते, बळीराम टेंभुर्णी, रामेश्वर घुगस्कर, कांतीलाल डोंगरे, संजय रामटेके, व गामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!