Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोरसड़क अर्जुनी

अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्रात विविध विकास कामाचे भूमिपूजन

सडक अर्जुनी – अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यात सडक अर्जुनी तालुक्यातील
ग्राम गिरोला/हेटी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक विकास योजना अंतर्गत गीरोला येथे बुद्ध विहार जवळ समाज मंदिर तसेच ग्राम हेटी येथे २५१५ अंतर्गत मार्तंड हटवादे ते कैलास राजगडे यांचा घरा पर्यंत सिमेंट रस्त्याचे कामांचा भूमिपूजन करणात आले.
त्याच प्रमाणे

अर्जुनी मोर तालुक्यात
एक कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यामध्ये धाबेटेकडी/आदर्श, कालीमाटी, गोठणगाव, तुकुमनारायण, झाशिनगर, जांभळी/येलोडी, कान्होली, पाढरवणी/माल इत्यादी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, २५१५, स्थानिक आमदार विकास निधी, अल्पसंख्याक विकास निधी,तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, आवरर्भिंत, समाजमंदिर, सिमेंट काँक्रीट नाली, पेविंग ब्लॉक बांधकामाचा समावेश आहे.

आमदार आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नातून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून ग्रामीण भागात विकासकामे केली जात आहेत. या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळाली आहे. हा निधी जनतेच्या अत्यावश्यक कामांसाठी वापरण्यात आला आहे. हा निधी मूलभूत सुविधांवर भर देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी वापरला जात आहे.

अर्जुनी मोर तालुक्यात झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, प. स. सदस्य आम्रपालीताई डोंगरवार, प. स. सदस्य,नूतन सोनवाने, प. स. सदस्य नाजूक कुंभरे, आणि आदी उपस्थित होते. सडक अर्जुनी तालुक्यातील कार्यक्रमात
डॉ.अविनाशजी काशीवार, प.स.सदस्य डॉ.रुखिराम वाढई,सौ. सुरेखाताई धुर्वे सरपंच गीरोला, सौ. पुजाताई कुंभरे, सरपंच, हेटी, भृंगराजजी परशूरामकर, सौ.मंगलाताई कापसे उपसरपंच गीरोला, श्रीराम पुस्तोडे, आणि इतर नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!