ना मंच,ना माईक ,चक्क झाडाखालीच एकूण घेतल्या चंद्रिकापुरेंनी ग्रामस्थांच्या समस्या
अर्जुनी मोरगाव – MKM news 24 –कोणताही मंचक नाही.बोलायला माईक नाही.कोणताही बडेजाव,आदरातिथ्य नाही.भेटीची पूर्वसूचना सुद्धा नाही.अचानक आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी बुधवारी थेट खामखुरा गावाला भेट दिली.ग्रामस्थांसोबत झाडाखाली बसून त्यांनी संवाद साधला.त्यांच्या भोळेपणाची पंचक्रोशीत एकच चर्चा सुरू झाली आहे.
खामखुरा येथील ग्रामस्थांनी घरकुल, शेती,ओला दुष्काळ, राशनकार्ड आदि अडचणींचा आमदारांसमोर पाढाच वाचला.तत्पूर्वी त्यांनी ग्रामस्थांच्या खुशहालीची आस्थेने विचारपूस केली.ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या समस्या निवारणासाठी त्यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.अनेकांच्या समस्या तर चुटकीसरशी पूर्ण झाल्या.काही समस्यांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने त्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन त्यांनी तक्रारकर्त्यांना दिले.
आमदारांच्या या थेट संवादाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
गावात आमदारांच्या भेटीचे कोणतेही नियोजन नसतांना त्यांनी दिलेल्या भेटीची एकच चर्चा गावात ऐकू येत आहे.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे,निप्पल बरेय्या, पं स सदस्या भाग्यश्री सलामे,मनोहर सोनवाने, चंद्रकुमार रंगारी,सोमेश्वर संग्रामे, कैलास कासार,आनंद तिडके,संतोष कोहळे,अशोक ठाकरे, दिलीप राऊत, सुरेंद्र दूनेदार व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.