Thursday, May 15, 2025
सड़क अर्जुनी

खोडशिवनी येथे ‘ एकलव्य ‘ मूर्ती स्थापना समारोह थाटात संपन्न

सडक अर्जुनी -MKM NEWS 24 –दी. २८/१०/२२ रोज शुक्रवारला एकलव्य दिवस समाज संघटना खोडशिवनी च्या वतीने मत्स्यपालन सह. संस्था चे भव्य प्रांगणात एकलव्य ‘ मूर्ती स्थापना समारोह थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हस्ते तर अध्यक्ष स्थानी दीनानाथ वाघमारे संस्थापक संघर्ष वाहिनी, सहउद्घाटक राजकुमार बडोले माजी सामाजीक न्याय, मूर्तीपूजक संजय केवट, दीपप्रज्वलन गंगाधर पशुरामकर जिल्हाध्यक्ष रा. काँ, उमराव मांढरे सयोजक संघर्ष वाहिनी, प्रमुख मागदर्शन डॉ. योगराज दूधपाचारे कार्यध्यक्ष विदर्भ भोई समाज, विशेष अतिथी म्हणून निशाताई तोडासे जि. प. सदस्य, शालींदर कापगते उपसभापति, प.स डॉ. रुखीराम वाढई प. स.सदस्य,डॉ.अविनाश काशीवार तालुका अध्यक्ष रा. कॉ, हर्ष मोदी युवा भाजपा महामंत्री गोदिया, परेश दुगवार, मनिराम मौजे, उर्मिलाताई कंगाले सरपंच, ज गोपिचंद कुभले, ईश्वर सयाम, राहुल नागपुरे, राहुल यावलकर, विश्वनाथ नागपुरे भृगराज परशुरामकर,यांच्या प्रमुख उपस्थीत संपन्न झाला,

कार्यक्रमाला मागदर्शन करताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी ढीवर समाज हा अतिशय गरिबाचे जिवन जगणारा अज्ञानी समाज आहे. या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असून मासेमारी करतो या समाजाच्या समस्या तलावाचा अतिक्रमण, घरकुल योजना, तलावाचे खोलीकरण अश्या विविध समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू असे उदगार उद्घाटनीय भाषणेतून केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगद मेश्राम, मोरेश्वर नागपुरे, मंगल मेश्राम, अविनाश मेश्राम, सुखराम मेश्राम, शेषराम मौजे, चंद्रशेखर मेश्राम, पांडुरंग शेंडे, प्रमोद मौजे, शलिकराम दिघोरे, नरेश वालथरे, उर्मिला मांढरे, कविता शेंडे, यांनी अथक प्रयत्न घेतले. कार्यक्रमाला मोठया प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!