Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांचा निषेध

सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांचा निषेध

सडक अर्जुनी – 8/11/22- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सौ. सुप्रियताई सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याच्या निषेधार्थ आज सडक अर्जुनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार श्री.मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष श्री.गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा निषेध करुन मा. श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा नावाने तहसीलदार सडक अर्जुनी मार्फत मंत्री श्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती व पंरपरेला लाजिरवाणी गोष्ट आज या राज्यामध्ये घडली. जबाबदार पदावर असतांना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी अतिशय खालच्या पातळीवर जावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्या संसद् रत्न सुप्रिया ताई सुळे यांना शिवी दिली. ही अतिशय शरमेची बाब आहे. हे महाराष्ट्रसाठी व लोकशाहीसाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आज घडली. या घटनेचा निषेध सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असून यावेळेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या निषेध केला. यावेळेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पक्षाच्या वतीने अशा अर्वाच्च शिवीगाळ करणा·या मंत्र्याची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

यावेळी रमेश चु-हे माजी जिल्हा परिषद सदस्य, महीला तालुका अध्यक्ष सौ. रजनीताई गिरेपुंजे, कामिनीताई कोवे सभापती न. प, सौ. इंदुताई परशुरामकर माजी प.स.सदस्य, सौ.मंजूताई डोंगरवार माजी प.स.सदस्य, नगर सेविका सौ. शशिकलाताई टेंभुर्णी, छायाताई टेकाम, अफरोज शेख, दिलीप गभने, तालुका युवक अध्यक्ष राहूल यावलकर, दिनेश कोरे, हेमराज खोटेले, सुभाष कापगते, दिनेश दखने, उमराव मांढरे, प्रमोद लांजेवार, अमीन शेख, मुन्ना देशपांडे, आस्तिक परशुरामकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!