त्या अपघातानंतर काली पिली रोडवर दिसेना..

MKM NEWS 24 –
सडक अर्जुनी 20/11/22- दिनांक 16 नवम्बर ला सडक अर्जुनी गोंदिया मार्गावरील पाटेकुरा जवळ काली पिली आणि ट्रक चा भिसन अपघात झाला. हा अपघात एवढा प्रचंड मोठा होता की, एक व्यक्ती जागीच ठार झाला तर दोन व्यक्ती रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू पावले.तर काही 6 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात झाल्या पासून आता काली पिली ह्या रोडवर दिसेनाशी झाली आहे. कदाचित पोलीस विभागाच्या कारवाही च्या भीतीने काली पिली रोडवर धावत नसेल.
जनसामान्यांचा प्रश्न हा आहे की, ह्या काली पिली गाड्यांची परमिट आता सुध्दा सुरू आहे की कालबाह्य झाली आहे.


गाड्याची कँडीसन बधून तर ह्या जीर्ण झाल्या सारखे दिसतात. काय वाहतूक विभाग आणि पोलीस विभाग ह्या कडे जातीने लक्ष देत आहे. ह्या गाड्यांचे सर्व आवश्यक डॉक्युमेंट उदा. प्रवाशी संख्या किती असावी, इंसुरेंश, परमिट, ड्रायव्हर लायसन्स, आणि इतर अती आवश्यक डॉक्युमेंट हे परिपूर्ण आहेत काय? आणि मुख्य म्हणजे ज्या प्रमाणात काली पीली वाले ड्रायव्हर प्रवासी मिळण्याच्या नादात ती पळवतात , एकमेकांना ओवरटेक करतात हे सुद्धा अपघाताला आमंत्रण नाही काय ? ह्या पळवा पाळवी मुळे प्रवास्यांचा जीव जातो त्याचे काय ? जिम्मेदार कोण ?
तर नागरिकाचे म्हणणे आहे की , बसेसची सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे बस च्या फेऱ्या ह्या कमी झाल्यामुळे नाईलाजाने काली पिलीत बसावे लागते. तर पाटेकुरा मधील झालेल्या अपघातामुळे काही दिवस काली पिली बंद असेल मात्र काही दिवसांनी जसी सी लंका तशी असेल.
एका काळी पिली च्या मालकाने सांगितले आहे की, आम्ही RTO कडे नवीन गाडी खरेदी करायला तयार आहो आपण परमिट द्या आम्ही सर्व डॉक्युमेंट चि पूर्तता करू अशी मागणी केल्याचे संगितेले पण काही लक्ष दिले जात नाही, आम्हाला सुद्धा माहीत आहे की अशा जीर्ण झालेल्या गाड्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणे धोका दायक आहे. पर आम्हाला दुसरा कोणताही व्यवसाय नसल्या मुळे आम्हाला नाईलाजाने हे काम करावे लागते, परिवाराची जिम्मेदारी अंगी असल्यामुळे आम्हाला ड्रायव्हरकी करावी लागते.
तर नागरिकांची मागणी आहे की, अशा अवैध प्रवासी वाहतूक आणि वाहतूक नियमांना धाब्यावर बसवणार्या काळी पिली गाड्यांवर कारवाही करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता पोलीस विभाग काय कारवाही करते या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.