NIMA (अमृत महोत्सव) गोंदिया द्वारे निमांकन चे आयोजन
MKM NEWS 24 – डॉ. सुशील लाडे
सडक अर्जुनी – बी.एस.एम.एस. पदवीधर डॉक्टरांची संघटना NIMA गोंदिया आपले अमृत महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. या अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजनाच्या श्रूखंले अंतर्गत गोंदिया NIMA मार्फत निमांकन 2022 या एका दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी. सामाजिक न्याय मंत्री इंजी.राजकुमार बडोले साहेब हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात केंद्रीय निमा पदाधिकारी डॉ.आशुतोष कुलकर्णी ,डॉ.रवींद्र बोथरा,राज्ये शाखा सचिव डॉ.अनिल बजारे,तसेच निमा स्टुडंट्स फोरम चे राज्ये सचिव डॉ.राहुल राऊत हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिपाली रहांगडाले यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.चंदन रंगारी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. उल्हास गाडेगोने यांनी केले .कार्यक्रमात आयुर्वेदिक चिकित्सा या विषयावर डॉ. मीनाक्षी बनसोड व डॉ. पंकज दीडपाये यांनी केले.
आधुनिक उपचार पद्धती याविषयी डॉ. एल.ए. बजाज (सेंटर हॉस्पिटल) डॉ.रमेश गायधने डॉ. पराग जयपुरिया यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन NIMA जिल्हाध्यक्ष डॉक्टर उल्हास गाडेगोने , सचिव डॉ. रोशन देशमुख, कोषाअध्यक्ष डॉ. विवेक पराते यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन समिती अध्यक्ष डॉ. प्रभाकर गहाणे ,सचिव डॉ. सतीश लंजे, कोषाअध्यक्ष डॉ. धनंजय कापगते ,व समितीचे माननीय सदस्य गण डॉ.परमानंद कठाने,डॉ.दीपक उजवणे, डॉ. प्रवीण उजवने, डॉ.वैशाली लंजे, डॉ.पूजा कठाने. यांच्या अथक प्रयत्नांमुळे यशस्वीरित्या करता आले.
या कार्यक्रमात गोंदिया निमा संघटनेतर्फे अध्यक्ष डॉ. हरीश बजाज डॉ. शशीकांत पादुपोते ,डॉ. कमला पती खोब्रागडे, डॉ. राजेंद्र टेंबरे, डॉ. अमित साबू, डॉ. मनीष सोनी, डॉ. योगेंद्र भगत ,डॉ. गीता ग्यांनचंदानी हे उपस्थित होते.
गोरेगाव निमा शाखेतर्फे डॉ.हितेशकुमार पारधी, डॉ.योगेश हरिणखेडे,डॉ.संगीता देशमुख,डॉ.राहुल बिसेन हे उपस्थित होते.
तिरोडा निमा शाखेतर्फे डॉ.संदीप मेश्राम, डॉ.मनीष दुबे, डॉ.अविनाश अगरवाल,डॉ.अनिल पारधी,डॉ. रेवाशंकर पटले, डॉ.सतीश दुबे, तसेच
अर्जुनी मोरगाव शाखे तर्फे डॉ.रमेश कापगते , डॉ.दुर्गेश झोडे,डॉ.सुनीता कापगते , डॉ.योगेश गडीकर,
तसेच देवरी शाखेतर्फे, डॉ.आनंद चांदेवार , आमगाव शाखेतर्फे, डॉ.राहुल बीसेन, सालेकसा शाखेतर्फे, डॉ.शैलेश भसे ,डॉ.धवल बघेले, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
दिनांक 20 नवम्बर 2022 रविवारला अक्वा वाटत पार्क आणि रिसॉर्ट डूग्गिपार येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 200 मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. निमा गोंदिया शाखेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी या सर्व उपस्थित डॉक्टरांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले आहे.