Monday, May 12, 2025
गोंदियासड़क अर्जुनी

भारत जोडो यात्रे दरम्यान राहूल गांधी यांच्या सोबत निशांत राउत यांची चर्चा

सडक अर्जुनी- कन्याकुमारी पासून ते काश्मीर ३५०० की. मी. च्या पायी निघालेल्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रामध्ये आगमन होऊन त्या यात्रेने मध्यप्रदेशमध्ये मार्गक्रमण केले आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते

राहुलजी गांधी यांच्या सोबत गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निशांत राऊत यांनी १८ नोव्हेंबर ला अकोला जिल्यातील बाळापूर येथे त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी निशांत राऊत यांनी राहूलजी गांधी यांचे सर्वप्रथम या यात्रेसाठी आभार मानले . गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासी भाग असून या भागातील तरुणांना पाहीजे तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नसल्याचे सांगीतले.

हे सांगताच राहूलजी गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याचा विचार भविष्यात करू असे आश्वासन दिले. पुढे निशांत राऊत यांनी राहुल गांधी यांना गोंदिया जिल्हयात येण्याचे नियंत्रण दिले. तेव्हा राहूल गांधी यांनी होकार दिला.यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, आमदार प्रज्ञा राजीव सातव व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!