Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

गुरुकुल करिअर अकॅडमी सडक अर्जुनी येथे सत्कार समारंभ व एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

MKM NEWS 24 – संपादक -डॉ.सुशील लाडे 
सडक अर्जुनी – दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ला संविधान दिवसाचे अवचित्य साधून गुरुकुल करिअर अकॅडमी सडक अर्जुनी येथे एकेडमी च्या माध्यमातून यस संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार व एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विक्रम आव्हाड न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालयात सडक अर्जुनी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सौ संगीता आव्हाड श्री. प्रमोद कुमार बघेले सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र गडेगाव, निहाल नायकवाडी कर व प्रशासन अधिकारी नगरपंचायत सडक अर्जुनी, प्राचार्य डॉ. राजकुमार भगतसर ,राजेश कठाने संचालक राज कम्प्युटर, डॉ. सुशील लाडे मुख्य संपादक MKM NEWS 24, आर. वि. मेश्राम सकाळ पत्रकार, बिर्ला गणवीर पत्रकार देशोन्नती, प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा राजेश शेंडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ध्येय व सातत्य कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
उपस्थित वक्ते त्यांनी आपल्या जीवनात मिळवलेल्या यशाचे गमक विद्यार्थ्यांना सांगितले.

यश मिळविण्यासाठी केलेल्या मेहनती विषयीची हितगुज विद्यार्थ्यांची केली .कार्यक्रमाप्रसंगी गुरुकुल करिअर अकॅडमी येथून मार्गदर्शन घेऊन येश संपादन केलेल्या उमेंद्र येल्ले यांचे SRPF क्रमांक 4 मध्ये, शेषराव भेंडारकर यांची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये खेमराज बोहरे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये अश्विन फुल्लुके यांची मर्चंट नेव्ही मध्ये लखन उरकुडे यांची मर्चंट नेव्ही मध्ये तेजस राऊत यांची ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून तर नीलम भैसारे यांची सुद्धा ब्रांच पोस्ट मास्टर म्हणून निवड व नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कुमारी प्रेरणा तागडे व कुमारी अपेक्षा गजभिये यांनी केले. तर पाहुण्यांचे आभार गुरुकुल अकॅडमीचे मार्गदर्शक राजेश शेंडे यांनी केले. कार्यक्रमा प्रसंगी परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या साठी श्री सचिन वाघाये सर श्री उत्तम फुंडे सर यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!