बौद्धगया (बिहार) येथे महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध भिक्खूची निवासाची सोय करा माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांची मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी
मुंबई —बौद्धगया येथे महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध भिक्खू यांचे निवासाची सोय त्या ठिकाणी होत नाही म्हणून बौद्धगया या ठिकाणी ५०० बौद्ध अनुयायी व बौद्ध भिक्खू करीता निवास बांधण्यात यावे.याकरीता महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची मुंबई येथे भेट घेवून निवेदनाव्दारे मागणी केली.
महाराष्ट्रातून दररोज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खू बौद्धगया येथे जातात.दरवर्षी हा आकडा साधारणतः दहा लाखाच्या वर असतो.परंतु त्या ठिकाणी या बौद्ध अनुयायांसाठी आणि बौद्ध भिक्खूसाठी निवासाची सोय नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या बौद्ध उपासक-उपासिकांसाठी तसेच बौद्ध भिक्खूसाठी बौद्धगया या ठिकाणी निवासाची सोय होणं गरजेचं आहे.बौद्धगया येथे भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली.त्यामुळे संपुर्ण जगात बौद्ध धर्मियांसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे. मागील अनेक वर्षापासून ही मागणी सातत्याने होत होती.
याबाबत माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि या संदर्भामध्ये बिहारचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना जागा उपलब्ध करून निवास बांधण्याची मागणी करावी याबाबत निवेदन दिले.
मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देवून याकरीता लवकरात लवकर संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना दिले.त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रातील जे बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध धम्मगुरू प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धगया येथे जातात त्यांची राहण्याची व निवासाची सोय त्या ठिकाणी होईल.