19 डिसेंबरला राष्ट्रवादीच्या वरीने 2500 शेतकऱ्यांचा विधानभवनावर धडक मोर्चा
राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित १९ डिसेंबर रोजी विधान भवनावरील मोर्चात सडक / अर्जुनी तालुक्यातील २५०० शेतकरी धडकणार
सडक अर्जुनी –राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक १९ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी मोर्चात महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सहभागी होणार असुन विद्युत विभागाच्या वतीने शेतकयांच्या शेतातील विद्युत पंपाची लाईन तोडू नये तसेच शेतकन्यांना १००० रु. बोनस देण्यात यावे यासह अनेक विषयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सडक/अर्जुनी तालुक्यातून २५०० शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मौजा कोहमारा येथील पक्षाच्या वतीने आयोजित सभेत केली.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मौजा कोहमारा येथे १९ डिसेंबरच्या मोर्चाची पूर्वतरीकरीता सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेस प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्या सौ. सुधाताई रहांगडाले, तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, पं.स. सदस्य श्री. शिवाजी गहाणे, नगराध्यक्ष तेजराम मडावी, पं.स. सदस्य डॉ. रुकीराम वाढई, नगरसेवक श्री. देवचंद तरोणे,
नगरसेवक आनंद अग्रवाल, श्री. डी.यु. रहांगडाले, फारूख शेख, उमराव मांढरे, चंदुभाऊ बहेकार, रमेश ईळपाते, उध्दव परशुरामकर, दिनेश कोरे, सुभाष कापगते, शामराव वासनिक, श्रीराम झिंगरे, ओमप्रकाश टेंभुर्णे, आस्तिक परशुरामकर, हिम्मत सुकारे, ईश्वर कोरे, एफ.आर.टी. शहा, खिलोज दोनोडे, यादोराव कापगते, सुखदेव कापगते, होमेश्वर परशुरामकर, नाशिक बंसोड, सचिन रहांगडाले, हिरालाल राऊत, नरेश चव्हाण, राजकुमार गजभिये, शाहिस्ता शेख, चोपराम आगाशे, खेवराम राऊत, जगन मोहुर्ले, भोलानाथ कापगते, सिध्दार्थ मेश्राम, ओमप्रकाश परशुरामकर सौ. किरण मडावी, केदार चव्हाण, आनंदराव ईळपाते यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.