Tuesday, July 1, 2025
सड़क अर्जुनी

सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुले या दोन महात्म्यांचे पदोपदी स्मरण होत राहील – आमदार मनोहर चंद्रिकापुरे

सडक अर्जुनी – MKM news 24 –

”महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समतेचा संदेश देत शिक्षण आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल केले. फुले दांपत्याने महिलांना शिक्षण देऊन समाज व्यवस्था बदलासाठीचे पाहिले पाऊल टाकले. या क्रांतिकारक निर्णयामुळे महिला शिक्षणात आज अग्रेसर आहेत,”” असे मत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. एरिया 51 कोहमारा ता.सडक/अर्जुनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मंगळवार(ता..३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदर मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
जोतिराव फुले यांनी विविध पातळीवर अनेक समाजपरिवर्तनाचे लढे दिले.

शिक्षणामुळे समाज शहाणा होईल, आपल्या एकतंत्री कर्मठ धर्मसत्तेला आव्हान देईल, म्हणून या दाम्पत्यावर हल्ले करण्यात आले, धमक्या देण्यात आल्या. अशा कसोटीच्या काळात सावित्रीबाईंनी दाखविलेले धैर्य एखाद्या योद्ध्यापेक्षा कमी नाही. त्यांनी ध्येयाने लढा दिला किंबहुना ज्योतिराव यांच्या पाठीशी राहून तो लढा तीव्र केला. कृतीचा निर्धार तर होताच, मात्र खरा आधार श्रेष्ठ अशा विचारांचा, मूल्यांचा होता. सहचारिणी म्हणून जोतिरावांबरोबर ठामपणे उभे राहणे महत्त्वाचे होते. त्यांना समाजशिक्षणाच्या माध्यमातूनच हे धैर्य प्राप्त झाले होते. त्यांनी तत्कालीन समाजातील अंतरंगाचे आणि क्रौर्याचेही सूक्ष्म निरीक्षण केले होते. परिणामत: त्यांचा विचार आणि कृतीची जोड अधिक मजबूत झाली. आजचे भारतीय समाजमन स्त्रियांना शिक्षण, शूद्रातिशूद्रास न्याय देण्याची भूमिका घेते किंबहुना त्याच विचारांचा विजय झाला. तो मानवतेच्या कल्याणाचा आणि मानवी उत्क्रांतीचादेखील मार्ग होता. यासाठी सावित्रीबाईंचे पदोपदी स्मरण होत राहते.

याप्रंसगी प्रा. मंजुताई चंद्रिकापुरे, डॉ.अविनाश काशीवार, ता.अध्यक्ष रा.का, रजनीताई गिरीपुंजे तालुका महिला अध्यक्ष, वंदना डोंगरवार उपाध्यक्षा, शिवाजी गाहणे प. स स, शशिकला टेम्भुर्ने नगरसेविका, पुष्पमाला बडोले, उमराव मांढरे छायाताई टेकाम, एफ आर टी शहा, दुलाराम चंद्रीकापुरे यांनी सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपले विचार व्यक्त मांडले,

यावेळी रमेश चुर्हे माजी जि. प. सदस्य, आनंद अग्रवाल नगर सेवक, शाहिस्ता मतिन शेख नगर सेविका, दिशा भगत नगर सेविका, भागवत झिंगरे, फारुख शेख, मुन्ना देशपांडे, कृष्णा ठलाल,ज्योती सुभाष बडोले, प्रमिला चौधरी, शुुभांगी वाढवे, रेखा परतेकी, उज्वला हटवार, शशिकला टेंभूर्णे, दसाराम पंधरे, हेमराज खोटेले, चंदूभाऊ बहेकार, भूमेश खोटेले, कृपेश वाढई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र चंद्रिकापुरे यांनी केले तर आभार प्रमोद लांजेवार यांनी मानले,

error: Content is protected !!