नव निर्वाचित सरपंचांनी गावाच्या सर्वांगिण विकासाचा ध्येय उराशी बाळगून कार्य करावे- आमदार मनोहर चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी – MKM news 24 –
देशाच्या सर्वांगिण विकासाचा पाया हा गाव असुन गावांचा विकास झाला तरच देशाचासुध्दा सर्वांगिण विकास होवू शकतो, त्यामुळे नवनियुक्त सरपंचानी गावाचा विकास आराखडा तयार करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून नव निर्वाचित सरपंचांनी गावाच्या सर्वांगिण विकासाचा ध्येय उराशी बाळगून कार्य करावे असे आवाहन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिनांक 4 जानेवारी रोजी सडक/अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन मध्ये आयोजित सडक/अर्जुनी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्या सत्कारप्रसंगी व्यक्त केले.
तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकार जिल्हाध्यक्ष रा का, इ.यशवंत गणवीर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सुधा रहांगडाले जि प सद्स्य, गजानन परशुरामकर सचालक GDCC बैंक, तेजराम मडावी नगराध्यक्ष सड़क अर्जुनी, वंदना डोंगरवार उपाध्यक्ष.
न प, कामिनी कोवे सभापति प. स., डा. रुकीराम वाढई प स सद्स्य, शिवाजी गहाने प स सद्स्य, रमेश चूर्हे माजी जि प सद्स्य, शशिकला टैम्भुर्ने माजी नगराध्यक्ष, आनंद अग्रवाल न प सद्स्य, दीक्षा भगत न प सद्स्य, शाहिस्ता शेख सदस्य न प, रूपविलास कुरसुन्गे माजी जि प सद्स्य, चंद्रकांत मरस्कोल्हे माजी जि प सद्स्य, डा. अविनाश काशीवार ता.अध्यक्ष रा.का.,सर्व ग्रा प नवनिर्वाचित सरपँच व सदस्य सडक/अर्जुनी तालुका व इतर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संघ सड़क/अर्जुनी ई. उपस्थित होते.