Thursday, July 3, 2025
क्राइमगोंदियासड़क अर्जुनी

डूग्गीपार पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीवर केला गुन्हा दाखल तर गोंदियात नऊ गुन्हे दाखल

डूग्गीपार पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल तर गोंदियात नऊ गुन्हे दाखल
सडक अर्जुनी/ गोंदिया – 9/1/2023- मा. उच्च न्यायालयाचे आदेशान्वये शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजा, चा वापर करणे, बाळगणे विक्री करणे, साठवणूक करणाऱ्यांवर गोंदिया पोलिसांची धडक कारवाई 9 गुन्हे दाखल 76,680/- रुपयाचा नायलॉन मांजा, मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त अशे की, नायलॉन मांजा चे वापरामुळे पशु, पक्षी आणि मनुष्य यांचे जीवितास धोका निर्माण होवून पर्यावरणाची हानी होत असल्याने नायलॉन मांजा चे वापरावर शासनाने प्रतिबंध केलेला आहे.
मकर संक्रांतीच्या सनाचे अनुषंगाने मोठया प्रमाणात पतंग उडविणे व नायलॉन मांझा चा सर्रास वापर केला जातो. ज्यामुळे , पशू ,पक्षी, मनुष्याच्या जीवितास व पर्यावरणास मोठ्या प्रमाणात नुकसान होतो.

सदरची बाब लक्षात घेवून गोंदिया जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. अशोक बनकर यांनी सर्व ठाणे प्रमुख यांना गोंदिया जिल्ह्यात सर्रासपणे नायलॉन मांजा चा वापर करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात नायलॉन मांजा चा वापर करणे, बाळगणे, विक्री करणे, साठवणूक करणे या बाबत जिल्हा पोलिसांतर्फे मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे.

या संबंधाने दिनांक- 07/01/2023 व दिनांक- 08/01/2023 रोजी नायलॉन मांजा चा वापर करणे, बाळगणे, विक्री करणे, साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली असून नायलॉन मांजा व इतर साहित्य असा एकूण 76,680/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे.

पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे 4 गुन्हे, रावनवाडी येथे 2 गुन्हे, आमगाव येथे 2 गुन्हे, तर दवणीवाडा येथे 1 असे एकूण 09 गुन्हे तसेच

आज दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी
डूग्गीपार ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. सिंगणझुळे यांनी दिलेल्या माहिती सुनार सडक अर्जुनी येथे दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यात 4250 रू.मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5, 15 अन्वये तसेच भादवि कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शना खाली पोलिसांनी केलेली आहे.

error: Content is protected !!