Friday, July 4, 2025
क्राइमगोंदियासड़क अर्जुनी

रानडुकराची शिकार करणारे आरोपी FDCM च्या जाळ्यात

सडक अर्जुनी- MKM news 24 –
सडक अर्जुनी तालुक्यातील दोडके जांभळी अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्रातील ५१७ च्या कंपार्टमेंट जवळ रानडुकराची शिकार करून पार्टी करणाऱ्या आरोपींना वनविकास महामंडळाच्या( FDCM) अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
ही कारवाई दिनांक १५ जानेवारी २०२३ सकाळी करण्यात आली. वनविभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी वन कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारावर, फिरते पथक आमगाव व वनपरिक्षेत्र कार्यालय दोडके जांभळीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त गस्तीमध्ये झुरकुटोला ते जांभळी रस्त्यावर गस्ती घातली. दरम्यान एक वाहन आढळून आले. वाहनातील व्यक्तीच्या संशयास्पद हालचालीवरून कंपार्टमेंट नंबर ५१७ च्या जवळ चार चाकी वाहन MH 30 L 6553 omani ची पाहणी केली असता, त्यामध्ये रानडुकराची शिकार करून आणलेले मास 2 किलो मटण आणि किरकोळ किराणा आढळून आले.

हे मांस घेऊन पार्टी करण्याचा बेत असल्याची माहिती मिळाली.ह्यात मुख्य आरोपी धनराज बालचंद्र कावळे वय २६ जांभळी , आणि इतर पाच व्यक्ती मौक्या स्थळी आढळले त्यात 1)अंकोष परमानंद रहांगडाले, जांभळी वय 26, (2)प्रवीण पुरनलाल बिजेवार जांभळी वय 29, (3)अशोक ईळपाते वय(45) जांभळी, (4)विशाल सुरज कोचे वय 29 जांभळी, (5) भिवराम बुधराम मंदारे वय (३८) अजून आणखी काही आरोपी ची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्यासह इतर काही व्यक्ती आल्याची कबुली दिली.

तसेच रानडुकराचे शिकार केल्याची चौकशी दरम्यान आढळले असे वन विभागाच्या वतीने माहिती मिळाली . सदर आरोपीवर गुन्हा क्र.2558,भारतीय वन्य जीव अधिनियम 1972 नुसार कारवाही करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक संचालक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनात जांभळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एन. नंदेश्वर, वनपाल रमेश लांबट, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, नागेश सिंगारपुतळे ,फिरते पथकचे महिला वनरक्षक माया घासले, रीना गौतम, सरिता बिसेन, दशरथ मिसे यांनी केली.
तपास फिरते पथकचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बागडे हे करीत आहेत.

error: Content is protected !!