माजी.मंत्री राजकुमार बडोले यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
गोंदिया – 17 जानेवारी 2023- आज मा.चिन्मयजी गोतमारे जिल्हाधिकारी गोंदिया यांची माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करून सदरील विषयी निवेदन दिले.
त्यामध्ये प्रामुख्याने ई-पिक पाहणी नोंदणी न झाल्यामुळे धान विकण्यास शेतकऱ्याला झालेली अडचण दूर करावेत,हत्तीच्या कळपाने नागलडोह येथील घरे उध्वस्त केल्याने नुकसान झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करावेत,जिल्ह्यातील वनजमीनचे प्रलंबित व्यक्तीगत व सामुहिक पट्टे वितरण मार्गी लावावेत,नवेगाव/बांध,गोठणगाव,मुरदोली येथील पर्यटन व इतर तीर्थस्थळाचा विकास आराखडा तयार करावेत,रेती ,मुरुम अभावी विकासकामे रखडले असून उपलब्ध करुन द्यावेत यासाठी आपण तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक विचार करून तात्काळ या बाबी मार्गी लावण्याची शाश्वती दिली.समवेत गोरेगाव पंचायत समिती सभापती श्री.मनोजजी बोपचे,जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मणजी भगत उपस्थित होते.