Sunday, August 24, 2025
अर्जुनी मोरक्राइम

कत्तलीकरिता जनावरांची वाहतूक करणारे तीन बोलेरो पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात

अर्जुनी मोर/ नवेगाबांध,दि.21ः पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नवेगावबांध पोलीस ठाणेतंंर्गत येत असलेल्या कोहलगाव परिसरात नाकाबंदी करुन कत्तलीकरिता जनावरांची वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच तीन बोलेरो पिकअप वाहनाना ताब्यात घेतले.

त्या वाहनाची तपासणी केल्यानंतर वाहनासह 30 जनावरे असा  22, लाख 15 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्तीची कारवाई 21 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजता करण्यात आली.पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम राबवण्यात येत आहे.

कारवाई दरम्यान वाहन क्र. एमएच- 40 सीएम.0257,वाहन क्रमांक एमएच 32 क्यू. 3513,वाहन क्रमांक एमएच 34 बीझेड 2434 अशी तीन बोलेरो चारचाकी पिकअप वाहनात 30 बैल, गाय, गोरे जातीची जनावरे कोणत्याही प्रकारची हालचाल न करता निर्दयतेने कोंबलेल्या स्थितीत दिसुन आल्याने तीन चारचाकी बोलेरो पिकअप वाहने किंमती अंदाजे 20,00,000/-रु व 30 नग जनावरे (बैल, गाय, गोरे) किंमती 2,15,000 /- रू चे असा एकुण 22, लाख 15 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.तसेच तिन्ही पिकअप च्या डाल्यामधील 30 जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी या करीता सुकृत गौशाला कल्याणकारी संस्था, खैरी पो. पिंपळगाव ता. लाखनी जि. भंडारा येथे दाखल करण्यात आले.

वाहन क्र. एम एच- 40 सी. एम. 0257 चा चालक व सहकारी आरोपी मोहन रमेश चौधरी, वय 32 वर्षे रा. आंबेडकर वार्ड, नवेगाव, ता. पवनी जि. भंडारा,निलेश ताराचंद भेंडर, वय 24 वर्षे रा. पहेला ता.जि. भंडारा.,वाहन क्रमांक एम एच 32 क्यू. 3513 चा चालक व सहकारी आरोपी चंद्रशेखर खेमराज लुटे, वय 27 वर्षे रा. सोमलवाडा, ता. लाखनी जि. भंडारा,अमित विजय देशमुख, वय 22 वर्षे रा. आकोट ता. पवनी जि. भंडारा,वाहन क्रमांक एम एच 34बी झेड 2434 चा चालक व सहकारी आरोपी राहूल प्रकाश गेंद, वय 33 वर्षे रा. गुजरी वार्ड ब्रम्हपुरी, ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर  व पवन पितांबर अमृतकर, वय 35 वर्षे रा. वार्ड न.4 शिवनगर नागभिड, ता. नागभिड, जि.चंद्रपुर.यांचे विरुध्द पोलीस ठाणे नवेगावबांध येथे कलम – 11(1),(ड), (ई),(फ),(ह),प्रा. नि. वा. का. 1960, सहकलम 5(अ), 2, 9 महा. पशु. सं. अधि.1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.आरोपी यांना नवेगावबांध पोलीसचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही नवेगावबांध पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी  संकेत देवळेकर यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, दया घरत, चा.पो. शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!