MKM NEWS 24 च्या बातमीची दखल,आठवडी बाजारात पोलिसांचा चोख बंदोबस्त, बाजारात मोबाईल चोरीची घटना नाही!
MKM NEWS 24 च्या बातमीची दखल,आठवडी बाजारात पोलिसांचा चोख बंदोबस्त, बाजारात मोबाईल चोरीची घटना नाही!
Editor in Chief – Dr. Sushil Lade
सडक अर्जुनी – आज दिनांक 4 फेब्रुवारी ला MKM NEWS 24 ने (“आज पुन्हा शनिवार, मोबाईल चोरांपासून सावध”!, https://mkmnews24.in/10724/)
या मथड्या खाली बातमी प्रकाशित केली होती. मागील कितेक महिन्यापासून बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली आहे. कित्येक नागरिकांचे मोबाईल बाजारात चोरीला गेले आहेत.
ह्या घटने ची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता शनिवार ला असते. नागरिकांना सावध करण्याच्या दृष्टीने आणि पोलीस विभागाला चोख बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने बातमी प्रकाशित करण्यात आली होती. ह्या बातमीची दखल घेत पोलीस विभागाने आज शनिवार दिनांक 4 फेब्रुवारीला पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
प्राप्त माहिती नुसार आज बाजारात मोबाईल चोरीची कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही. मोबाईल चोरीची घटना समोर सुद्धा घटनार नाही ह्या करीता भविष्यात पोलीस विभागाने सज्ज राहावे अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.
काही नागरिकांनी MKM NEWS 24 ला चक्क फोन करून बातमी प्रकाशित केल्या बद्दल आभार मानले आहे.