अवैध धंदे करणाऱ्या वर डूग्गिपार पोलिसांची धडक कारवाही
अवैध दारू धंद्यावर डूग्गिपार पोलिसांची धडक कारवाही
सडक अर्जुनी – तालुक्यात अवैध धंदे फोकावत असून त्यात दारू, सट्टा,जुवा आणि जो अवैध धंदे करताना मिळेल त्याला ठसका देत डूग्गिपार पोलिसांनी सौंदड येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
दुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध समूळ नायनाट करून अवैध धंदे करणाऱ्या वर वचक बसांवा याकरिता दिनांक 4 फेब्रुवारी रोजी डूग्गीपार पोलिसानं कडून विशेष मोहीम राबविण्यात आली. सौंदड येथे अवैध दारू बंदी सदराखाली रेड करून आशिष शालिकराम राउत यांचे रहते घरातून अवैध रित्या विविध नावाचे विदेश दारू एकूण 80 नग ,एकूण किंमत 12780 रुपये चा मुदेमाल जप्त करण्यात आला.
सदर धडक कारवाही पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे , अशोक बनकर अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया – कॅम्प देवरी ,संकेत देवलीकर उप विभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांच्या मार्गदर्शनात रेवचंद सिंगळजुळे पोलीस निरीक्षक डूग्गीपार पोलीस स्टेशन , पोह. जागेश्र्वर बीसेन, पोहवा झुंमन वाढई , पोशि सुनील डहाके, मपोसी रागिणी निखारे पोलीस स्टेशन डूग्गीपार यांनी केली.