माजी.मंत्री राजकुमार बडोले द्वारा सौंदड येथे वर्गखोलीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
सडक/अर्जुनी- 7/2/23- जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महा विद्यालय सौंदड येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 17. 34 लक्ष रुपयाच्या निधीतून वर्गखोलीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज 07 फेब्रुवारी ला दुपारी 12.10. वाजता संपन्न झाले.
त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी , त्यागमुर्ती माता रमाई यांच्या 125 वा जयंतनिमित्त त्यांच्या तेल चित्राचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तर शाळेतील विद्यार्थी यांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत सादर केले.
यावेळी अध्यक्ष स्थानी मंचावर माजी. मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. मंचावरून आपले मत वेक्त करताना बडोले म्हणाले की, ” गरिबी जरी त्या संसारात होती,रमाची भीमा ला तरी साथ होती, भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमा वात होती,” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हते तर ते संपूर्ण देशासाठी होते. बाबासाहेब आम्हा सर्वांना कळले नाही ते आमचे दुर्दैव आहे.
प्रत्येक महापुरुषाला घडविणारी स्त्री असते. त्या काळात लोक पाणी सुधा देत नव्हते. त्या काळात बाबासाहेब उच्च शिक्षित झाले ,माता रमाई ने बाबासाहेबांना खूप साथ दिली. स्वतः काबाळ कष्ट केले, सेनाव्या गोवऱ्या थापल्या , त्यांच्या त्यागा बद्दल सांगणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे सारखे आहे. त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले यांना साथ देणारी सावित्रीबाई फुले . छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे धडे देणारी राजमाता जिजाऊ . त्यांनी आपले जीवन लोकांसाठी अर्पण केलं. ही अशी समर्पणाची भावनी असायला पाहिजे असे मत त्यांनी मंचावरून वेक्त केले.
यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, पंचायत समिती सदस्य वर्षा शाहारे, सौंदड चे सरपंच हर्ष मोदी, भाऊराव यावलकर उप सरपंच सौंदड , ग्राम पंचायत सदस्य सुभम जनबंधू , ग्रा.प. सदस्य रंजू भोई, ग्रा. प. सदस्य सुषमा राऊत, ग्रा. प. सदस्य अर्चना चन्ने, ग्रा. प. सदस्य प्रमिला निर्वाण, ग्रा. प. सदस्य विजय चोपकर, व्यापारी आघडी चे अध्यक्ष संदीप मोदी, मुख्याध्यापक सुनील भिमटे, सहाय्यक शिक्षक अनिल बोरकर, सहाय्यक शिक्षक अनिल कापगते, सहाय्यक शिक्षक दमयंती तुरकर, पुरुषोत्तम निंबेकर, आशिष राऊत, ऋषभ राऊत सह गावातील अन्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जयपाल मोटघरे सहाय्यक शिक्षक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार लोकेश रहांगडाले सहाय्यक शिक्षक यांनी मानले.