सडक अर्जुनी नगर पंचायतच्या सभापती पदाच्या निवडणुका संपन्न
सडक अर्जुनी – 22/2/23- नगरपंचायत सडक अर्जुनी च्या सभापती पदाच्या निवडणुका मंगळवार (दि. 22 ) रोजी घेण्यात आल्या त्यामध्ये बांधकाम सभापती अंकित टिकारामजी भेंडारकर, महिला व बालकल्याण सभापती दीक्षा राजकुमार भगत, पाणीपुरवठा सभापती शाहिस्ता मतीन शेख , आणि उपाध्यक्ष वंदना किशोर डोंगरवार यांच्याकडे स्वच्छता समिती कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक शांततेत पार पडली.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, राजेश नंदागवळी, सैलेश जायस्वाल,मनोज रामटेके, महेश डूंभरे ,दिलीप गभणे,रोशन बडोले प्रामुख्याने उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेमध्ये नगराध्यक्ष तेजराव मडावी. उपाध्यक्ष वंदना डोंगरवार ,नगरसेवक आनंद अग्रवाल,महेंद्र वंजारी, अंकित भेंडारकर, देवचंद तरोणे, अनिल राजगिरे, असलेस अंबादे, गोपीचंद खेडकर, नगरसेविका शशीकला टेंभुर्णे, सायमा शेख, कामिनी कोवे. कमलादेवी अग्रवाल. रजनी परिहार .रेणू अग्रवाल, स्वीकृत सदस्य, राजकुमार हेडाऊ , रीता लांजेवार उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेमध्ये पीटासीन अधिकारी म्हणून कुमारी पर्वणी पाटील. मुख्याधिकारी तथा तहसीलदार गणेश खताळे, कर अधिकारी निहाल नायकवडी व नितीन मोठे यांनी भूमिका पार पाडली.