आमदारांची उपोषणकर्त्याना भेट ,समस्या निकाली काढण्याचे CEO यांना दिले निर्देश
सडक अर्जुनी – MKM news 24 –मानधन मिळण्यासाठी गेल्या १४ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या हातपंप यांत्रिकी कर्मचाऱ्यांना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मंगळवारी भेट दिली.त्यांच्या समस्येसंदर्भात जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचेशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
हातपंप यांत्रिकी कर्मचाऱ्यांना जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत आठ महिन्याचे मानधन मिळाले नाही.त्यामुळे कुटुंबियांची उपासमार होत आहे.मुलांचे शिक्षणात अडचणी येत आहेत.मानधन मिळावे यासाठी गेल्या १४ दिवसांपासून हे कर्मचारी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.अद्याप याची दखल कुणीच घेतली नाही.मंगळवारी आ चंद्रिकापुरे यांनी भेट दिली.उपोषणकर्त्यांच्या मागणीसंदर्भात मु का अ यांचेशी चर्चा केली. त्यांना मानधन देऊन समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले.