Thursday, May 15, 2025
क्राइमगोंदिया

शासकीय योजनेचा तांदूळ चोरी करणाऱ्या चौघांना अटक, 11 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया – दिनांक 23/04/2023 चे रात्री 23/10 वा. चे सुमारास पो. नि. श्री. सचिन म्हेत्रे, ठाणेदार गोंदिया ग्रामीण यांना गोपनीय बातमीदार कडून माहीती प्राप्त झाली की, काही ईसम हे छोटा हाथी टिप्पर वाहन क्र.MH -35 AJ-1071 मध्ये चोरीचा तांदुळ गोंदिया कडून गोरेगावकडे घेवुन जात आहेत. अशी प्राप्त खात्रीशीर माहिती मा. वरिष्ठांना कळवून मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पो. नि. म्हेत्रे यांनी रात्र गस्तीवरील स्टॉफला तांदूळ चोरी करून घेवून जाणाऱ्या वाहनाचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पो. नि. म्हेत्रे यांनी स्वतः कारवाईस रवाना होवून पो. ठाणे गोंदिया ग्रामीण रात्र गस्ती वरील पो. स्टाफ ला शासकिय वाहनासह किंजल राईस मील जवळ धिमरटोली येथे पोहचण्या च्या सूचना दिल्या. प्राप्त खात्रीशिर माहिती प्रमाणे पो. स्टाफ सह फुडलैंड हॉटेल, धिमर टोली येथे नाकाबंदी केली असता रात्री 00.35 वाजता चे सुमारास वरील नमूद क्रमाकांचे वाहन गोंदिया कडुन गोरेगांव कडे येताना दिसल्याने सदर वाहनास पोलीस स्टाफ चे मदतीने थांबविण्यात आले.माहिती नुसार खात्री करून वाहना ची पाहणी केली असता सदर वाहनाचे मागे डाल्या मध्ये मालावर 09 व कॅबीन मध्ये 02 असे एकूण 11 इसम बसल्याचे दिसुन आले. सदर वाहन क्र.MH- 35 AJ- 1071 चा चालक नामे- सुधीर हंसराज शहारे वय 35 वर्ष रा. मुंडीपार यास छोटा हाथी (टिप्पर) मध्ये भरले ल्या मालाबाबत विचारणा केली असता त्याने टिप्पर च्या डाल्यामध्ये तांदुळ असल्याचे सांगुन कॅबीन मधील बसलेला इसम नामे धर्मेन्द्र मारवदे रा. धीमरटो ली चे मदतीने चोरुन मुंडीपार येथे घेवुन जात असल्याचे सांगीतले.

केबीन मधील इसमा स त्याचे नाव विचारले असता त्याने मनीष महेन्द्र शेंडे वय 30 रा. कु-हाडी असे सांगुन टिप्परचे मागे मालावर बसलेले लोक हमाल असल्याचे सांगुन बम्लेश्वरी गोडाऊन, मील टोली येथील संजय डोमळे व धर्मेन्द्र मारबदे यांचे मदतीने गोडाऊन मधील प्रत्येकी 50 किलो वजना चे अंदाजे 185 कट्टे तांदुळ चोरल्याचे सांगितल्याने टिप्परमध्ये भरलेल्या माला ची तपासणी केली असता प्रत्येक कट्यावर लावले ल्या लेबलवरील डि.सि. पि.एस. स्किम, डि.एम.ओ गोंदिया लॉट नं. 18 जय बम्लेश्वरी राईस मिल, फुल चुर, गोंदिया महाराष्ट्र शासन ईत्यादी मजकुरा वरून सदर तांदुळ हा शासकिय योजनेचा असल्याचे दिसुन आले.

सदर टिप्पर मधील तांदुळ हा चोरीचा असल्या चे स्पष्ट झाल्याने पो. नि. म्हेत्रे यांनी टिप्पर मधील तांदळा चे प्रत्येकी 50 किलो वजनाचे 185 कट्टे किंमती अंदाजे 1,85,00 0/- रुपये तसेच छोटा हाथी टिप्पर क्र. MH-35 AJ-1071 किंमती अंदाजे 10 लाख रुपये असा एकूण 11 लाख 85, हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

बम्लेश्वरी गोडाऊन ढिमरटोली येथुन शासकिय तांदूळ चोरी प्रक्ररणी आरोपी नामे –
1)मनीष महेन्द्र शेंडे वय 30 वर्ष रा. कु-हाडी

2)सुधीर बेसराज शहारे वय 35 वर्षे रा.मुंडीपार

3) संजय डोमळे रा. मिलटोली

4) धर्मेन्द्र मारबदे रा. धिमर टोली

यांचे विरूद्ध पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे गुन्हा रजी नोंद क्रं. 161/ 2023 कलम 380, 381, 34 भादंवि.अन्वये दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वर नमूद 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्या चे अनुषंगाने अधिक चा तपास मा.वरिष्ठांचे मार्गदर्श नात पो. नि. म्हेत्रे, गोंदिया ग्रामीण हे करित आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे निर्देश सूचना प्रमाणे श्री. सुनील ताजने, उपवि भागीय पोलीस, अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे, यांचे नेतृत्वात परी. पोउपनि. रवी कवडे, पोहवा. कोकोडे, सैनिक सनद क्र.76, 209, 311, यांनी अथक परिश्रम घेवून कामगिरी केलेली आहे.

error: Content is protected !!