नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
सडक अर्जुनी – विधानसभा क्षेत्रात आठवडाभरापासून अवकाळी पाऊसयेत आहे.शेतपिकांना गारपीट व अतिवृष्टीचा फटका बसला आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.मका व धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
मागील आठवडाभरापासून अर्जुनी विधानसभा क्षेत्रात गारपीट व अवकाळी अतिवृष्टीचा फटका शेतपिकांना बसला आहे.सुमारे १५ हजार हेक्टरमधील रब्बी धानपिकाचे नुकसान झाले आहे.तर १० हजार हेक्टर शेतातील मकापीक पूर्णतः नष्ट झाले आहे.शासनस्तरावरून अद्यापपर्यंत पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निवेदन आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.यावेळी तुमसरचे आ राजू कारेमोरे त्यांच्यासोबत होते.