वाचनालय ही लोक चळवळ व्हावी— आमदार मनोहर चंद्रीकापुरे
सडक अर्जुनी – mkm news 24-आजच्या आधुनिक काळात मोबाईल व इंटरनेट मुळे वाचन संस्कृती लोक पावत चालली आहे. त्यामुळे वाचनालयांनी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वाचण्याची आवड निर्माण होईल या परीने कार्य करून वाचनालयात ही लोक चळवळ होईल या परीने कार्य करावे,असे आव्हान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शासनमान्य वाचनालयाला पुस्तक वाटप समारंभात केले.
श्री मनोहर चांद्रिकापुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून मौजा कोहमारा (एरिया 51) येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 18 , सडक अर्जुनी तालुक्यातील 31, व गोरेगांव तालुक्यातील 11 . अश्या ऐकून 60 वाचनालयाला आपल्या निधीतून 50 लक्ष रू .ची स्पर्धात्मक व ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाकरीता जी.प. सदस्या सौ.सुधा रहांगडाले, पंचायत समिती सदस्य डॉ. रुकिराम वाढाई,शिवाजी गहाने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजिनियर डी. यु.रहांगडाले, दादा संग्रामे, भागवत झिंगरे, अनिताताई बांबोर्ड, एफ, आर टी.शहा, तसेच पत्रकार डॉ. सुशील लाडे, बिरला गणवीर ,अनिल मुनेश्र्वर, शाहिद पटेल ,चनद्रमुनी बनसोड व सर्व साठही ग्रंथालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार महेंद्र चंद्रिकपुरे यांनी मानले .