सडक अर्जुनी नगरपंचायत द्वारे RRR सेंटर चे शुभारंभ
सडक .अर्जुनी – ( डॉ.सुशील लाडे) – स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाच्या (Union Ministry of Housing and Urban Development) मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर है (Meri Life Mera Swachh Shahr Abhiyan) अभियान राबविले जात असून या अभियानांतर्गत सडक अर्जुनी नगरपंचायत द्वारे शहरात आर. आर. आर. सेंटर चे उद्घाटन आज दिनांक 20 मे 2023 रोजी सकाळी 9:26 ला करण्यात आले. सडक अर्जुनी नगरपंचायत च्या चाळी मध्ये दुर्गा चौक ( पोलीस चौकी रूम मध्ये) हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष तेजराम मडावी यांनी सांगितल्या प्रमाणे गरजू व्यक्तींसाठी कोणीही कपडे, जुते,खीलोने, जुनी पुस्तके, कंबल, ह्या सेंटर मध्ये देहू शकतात. जेणे करून गरजूंना ते पुरविण्यात येत असून गरजू व्यक्ती आपल्या आवश्यकता नुसार सामान नेहु शकतो. विशेष म्हणजे आर.आर.आर.केंद्राद्वारे शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्युस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स म्हणजे आर.आर.आर.केंद्र येथे जमा करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नुतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करण्यात येणार आहेत.
दि.20 मे रोजी आर. आर. आर. केंद्रांचे उद्घाटन करुन दि.20 ते दि.5 जूनपर्यंत रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत चालू ठेवन्याय येहिल. गोळा केलेल्या वस्तूंच्या नोंदी ठेवण्यासाठी नोंद वही असेल, वस्तू गोळा करण्यासाठी, नागरिकांना माहिती देण्यासाठी तसेच घरोघरी संपर्क करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, आर. आर. आर. केंद्रे चालविण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी शहरातील व संस्थांना सहभाग करावे असे आव्हान सुद्धा नगरपंचायत द्वारे करण्यात आले आहे . ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्यां हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष वंदना डोंगवार सभापती- स्वच्छ्ता आणि आरोग्य, दीक्षा भगत सभापती – महिला व बालकल्याण , नगरसेविका – शशिकला टेंभुर्ने, सायमा सेख, कामिनी कोवे, अभियंता राजीव जाधव, योगेश देशमुख शहर स्वच्छता समन्वयक , पत्रकार डॉ.सुशील लाडे, डॉ.प्रा. राजकुमार भगत, आर. व्ही.मेश्राम, बिरला गणवीर, सामाजिक कार्यकर्ता उमेश उदापुरे तथा नगरपंचायत कार्यालय चे कर्मचारी उपस्थित होते.