महामार्ग पोलिस मदत केंद्र डोंगरगाव तर्फे अपघात डेमो
सडक अर्जुनी –आज दिनांक-२४/०५/२०२३ रोजी महामार्ग पोलीस मदत केंद्र डोंगरगाव जिल्हा गोंदिया तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-53 वरील उकारा फाटा येथे Accident Demo घेण्यात आला त्यावेळी आम्ही प्रभारी अधिकारी Api डेहनकर , Api भुते साहेब, Psi गेडाम साहेब,Psi जोकर साहेब व अंमलदार हजर होते.
पोलीस नियंत्रण कक्ष गोंदिया येथे १६/०९ वा. म.पो. केंद्राचे वायरलेस सेट वरून ट्रक आणि टू व्हीलर मध्ये अपघात झाल्याची माहिती देऊन स्टाफ सह स्ट्रेचर सह रवाना झालो.
अपघाताची माहिती घेऊन लगेच अशोका टोल प्लाजा येथील मॅनेजर व ॲम्बुलन्स यांना फोन करून ॲम्बुलन्स ला कॉल करण्यात आला .
पोहोचल्यानंतर स्ट्रेचर च्या साह्याने जखमीना ॲम्बुलन्स मध्ये टाकून हॉस्पिटल कडे रवाना केले. त्यापूर्वी सडक अर्जुनी नगरपालिकेची फायर ब्रिगेड ला सुद्धा कॉल करण्यात आला होता ब्रिगेड सुद्धा लगेच हजर झाली.
संपूर्ण कारवाई २०/०० मिनिटाच्या आत मध्ये करण्यात आली.