Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

गुरुकुल कॅरियर अकॅडमी सडक अर्जुनी द्वारा पोलीस दलात नियुक्त झालेल्या उमेदवारांचा सत्कार

सडक अर्जुनी – आज दिनांक 17 मे 2023 रोज शनिवारला गुरुकुल करिअर अकॅडमी येथे अकॅडमी च्या माध्यमातून यश संपादन करून महाराष्ट्र पोलीस सेवेत नियुक्त झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे सत्कार जल्लोषात साजरे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आर्.वी. मेश्राम सर पत्रकार सकाळ तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुशील लाडे – मुख्य संपादक mkm न्यूज 24, शाहिद पटेल पत्रकार नवभारत, असलेश माडे पत्रकार, तसेच राजेश शेंडे मार्गदर्शक गुरुकुल करियर अकॅडमी तसेच सुषमा राजेश शेंडे संचालिका गुरुकुर करिअर ॲकॅडमी होते.

कार्यक्रमा प्रसंगी गोंदिया जिल्हा पोलीस दलात निवड झालेल्या उत्तम फुंडे, अशोक वरकडे, शेषराव भेंडारकर, नितेश कोरे, सत्यपाल घरत, संदीप घरोटे, तसेच नागपूर जिल्हा पोलीस दलात नियुक्त झालेले डी.एम. म्हस्के तर मुंबई पोलीस दलात निवड झालेले रूपाली भिवगडे, आयूषी कोटांगले इत्यादींचा पुष्पमाले द्वारे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन कु. तितीज्ञा राजेश शेंडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार कु. ऋतुजा भाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुल करिअर अकॅडमीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!