Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोर

जलजीवन मिशन अंतर्गत कोरंबीटोला येथे पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

अर्जुनी मोरगाव – 3 जून 2023 –दिनांक 03/06/2023 रोज शनिवारला ग्रामपंचायत कोरंबीटोला येथे अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली व भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशन अंतर्गत 67 लक्ष किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

महिला सबलीकरण व पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यापासून मुक्त करण्यासाठी शासनस्तरावर हर घर जल हा उपक्रम राबवण्यात येत आहे. “पाणी हेचि जीवन” मानवी जीवन जगत असताना पाणी हा महत्त्वाचा घटक आहे.त्यासाठिच महागाव जिल्हा परिषद क्षेत्रातील कोरंबीटोला येथील माता भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असे,त्यांची हि पायपीट दूर व्हावी यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून सदर काम मंजूर करुन आणले.त्यांना पिण्यासाठी शुद्ध जल मिळावे यासाठी सतत प्रयत्न करुन जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम मंजूर केले व सदर कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. 67 लक्ष रुपयाच्या जल जिवन मिशन या योजनेच्या कामामध्ये नवीन पाण्याची टाकी, नवीन विहीर, नवीन पाईप लाईन व नळ जोडणी या कामाचा समावेश आहे. या योजनेमुळे महिला सशक्तिकरण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक घरात पाण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

सदर भुमिपुजन सोहळ्याला जयश्री देशमुख जिल्हा परिषद सदस्य गोंदिया,होमराज पुस्तोदे उपसभापती पंचायत समिती अर्जुनी/मोर. नाजूक कुंभरे सदस्य पंचायत समिती अर्जुनी /मोर, यशोदा नाकाडे सरपंच,भगवान नाकाडे उपसरपंच, लोकपाल गहाणे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, विजय कापगते तालुकाध्यक्ष भारतीय जनता पक्ष, माजी जिल्हा परिषद सभापती उमाकांत धेंगे,कमलेश वंजारी ग्रामपंचायत सदस्य, तेजस्विनी पोहले ,रामचंद्र नाकाडे, स्वप्निल मलगाम ,नासिका उईके, केतकी वंजारी, अमिता नाकाडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कोरंबीटोला साधूजी नाकाडे तंटामुक्त समिती अध्यक्ष, ललित नाकाडे,शंकर नाकाडे व ग्रामसेवक पारधी व मोठय़ा संख्येने गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!