Sunday, August 24, 2025
दुर्घटनासड़क अर्जुनी

सडक अर्जुनी – वीज पडून घाटबोरी/ तेली येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

सडक अर्जुनी – 21/7/23- तालुक्यातील ग्रामपंचायत घाटबोरी /तेली येथील रहिवासी ओमदास सखाराम वाघाडे (वय 55 वर्ष) ह्या शेतकऱ्याचा आज दिनांक 21जुलै 2023 रोजी अंदाजे 2: 20 वाजता वीज पडून जागीच मृत्यू झाला .

प्राप्त माहितीनुसार ओमदाश वाघाडे यांची शेती घाटबोरी / कोहळी येथे होती. ते शेतात रोवनीचे काम करण्याकरिता गेले असता शेतात रोवणीचे काम करीत असतांना अचानक सुरू झालेल्या विजेच्या कडकडाट मध्ये वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला .

भात रोवणीच्या कामाला वेग आलेला असून, सर्व शेतकरी आपापल्या शेतामध्ये भात रोवणीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. अशातच, आज दुपारी झालेल्या विजेच्या कडगटासह पावसाला सुरुवात झाली. सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी / तेली येथील रहिवाशी ओमदाश वाघाडे हे शेतामध्ये भात रोवणीच्या कामाला गेले असता, अचानक झालेल्या विजेच्या गडगडामध्ये विज त्यांच्या अंगावर पडली आणि ते जागीच ठार झाले.  तर सरकारी यंत्रणेने मौका चौकशि करून बॉडी शव विच्छेदन करीता पाठवण्यात आल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.

error: Content is protected !!