गोंदियातील तरुणाने केली ऑनलाईन गेमिंग ॲप द्वारे 58 कोटीची फसवणूक
गोंदिया – 22 जुलै 2023 – ऑनलाईन गेमिंग च्या माध्यमातून नागपूरच्या तरुणाची गोंदियातील तरुणाने
५८ कोटीची फसवून करणाऱ्या आरोपीच्या घरून मिळाले १० कोटी रोखड आणि २ किलोच्या वर सोने.
ऑनलाईन गेमिंग च्या माध्यमातून नागपुरातील उद्योग पतीच्या मुलाची गोंदियातील तरुणाने ५८ कोटी रुपयाने फसवणूक केली असून गोंदियातील आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरात नागपूर पोलिसांनी गोंदिया पोलिसानं सोबत संयुक्त धाड टाकत १० कोटी च्या वर रोख रक्कम आणि २ किलोच्या वर सोन्याचे बिस्कीट आतापर्यंत जप्त केले आहे सकाळी ७ वाजे पोलिसांनी हि धाड घातली असून संध्याकाळी ५ वाजे पर्यंत पोलिसांच्या तपासात हे उघड आले आह
गोंदिया शहराच्या सिव्हील लाईन भागातील काका चौकात जैन यांचे घर आहे तर अंनत नवरतन जैन यांचे गोंदिया शहराच्या मुख्य बाजार पेठेत त्यांचे कुर्त्याचे दुकान असून त्यांना गोंदियात कुर्तेवाला म्हणून ओडखळे जाते . मात्र कुर्ते व्यपाऱ्याच्या आड त्यांचा मुलगा अनंत हा ऑनलाईन गेमिंग खेळवत असून नागपुरातील एका प्रसिद्ध व्यापाराच्या मुलगा हा ऑनलाईन गेम खेळताना गोंदियातील अंनत जैन यांच्या संपर्कात आला असून . अनंत ने त्याची २०२१ ते २०२३ या काळात ५८ कोटी ४२ लक्ष रुपयाने फसवून केली असून . फिर्यादीने आपली फसवणूक झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता .
हा संपूर्ण प्रकार उघड आला असून नागपूर पोलिसात फिर्यादीने अनंत जैन यांच्या विरोधात तक्रार दाखल करताच नागपूर पोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने छापेमार कार्यवाही करीत . आरोपी अनंत नवरतन जैन यांच्या घरातुन १० कोटी च्या वर रोख रक्कम आणि २ किलो वजनी सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहे
कारवाई दरम्यान मिळुन आलेली सदर रोकड व दागिने नागपूर पोलिसांच्या ताब्यात नागपूर येथे देण्याची कारवाई चालू आहे. सदरचा तपास नागपूर पोलीस आयुक्त च्या मार्गदर्शनात चालू आहे.