तलावाचा सांडवा फुटला पण लक्ष नाही, पाटबंधारे विभाग झोपेत,पळसगाव/राका येतील प्रकार
सडक अर्जुनी – अधिकारी फक्त कार्यालयात जाहून सह्या करून भरगच्च पगार घेण्यातच खुश असतात. एकतर नियमाप्रमाणे वेळेवर कार्यालयात जात नाही आणि गेले तर वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता दुपारलाच सुट्टी काढत असतात.
कोणीही विचारणा करत नसल्यामुळे हा असला प्रकार हमकाश बघावयास मिळतो. या कारणामुळे कित्येक समस्या कडे अधिकाऱ्यांचे लक्ष राहत नाही.कित्येक योजना,कामे,रखडली जातात. एक जिवंत उदाहरण म्हणजे प्राप्त माहिती नुसार सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव/ राका येथील मामा तलावाच्या सांडव्याची मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही.
परिणामी या सांडव्यातून मोठ्या प्रमाणत जास्त प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना सिंचना पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. नवेगाव बांध पाटबंधारे उप विभाग अंतर्गत येणाऱ्या शाखा सौंदड अंतर्गत तलावाच्या सांडव्याचे बांधकाम सिमेंट व दगडाने करण्यात आले.
पण हे बांधकाम फार जुने असल्याने मोठ्या प्रमाणात तुटफुत झाली आले. या तलावाची डागडुजी करण्याची नितांत गरज आहे. पळसगाव /राका येथील मामा तलावाच्या सांडव्याची मागील वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत तूट फूट झाल्याने पाणी वाहून जाऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची माती भरून पोती लावण्यात आली होती. सांडव्याचि पाळ जीर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात तलावातील पाणी वाहून जात आहे. या सांडव्याचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी करणे अत्यंत आवश्यक होते. पण बांधकाम न केल्यामुळे सांडव्यातुन पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. परिणामी तलावात पाणी राहणार नाही.
तलावाच्या माध्यमातून 243 हेक्टर क्षेत्राला सिंचन होत असते. पण सांडव्याच्या दुरुस्ती अभावी संपूर्ण पाणी वाहून जात असल्याने शेतकऱ्यांना सिंचाना पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.