Tuesday, May 13, 2025
गोंदिया

गोंदिया येथील मिल्खासिंग म्हणून नावलौकिक मिळवलेले श्री. मुन्नालालजी यादव यांचा गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे सत्कार 

गोंदिया – गोंदिया शहारातील सन्माननीय श्री.मुन्नालालजी यादव वय 81 वर्षे यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याचे कौतुक आणि अभिनंदन म्हणून आज दिनांक – 21/07/2023 रोजी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे सर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. अशोक बनकर सर, यांचे हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, शुभेच्छापत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे  मुन्नालाल जी यादव यांना गोंदियाचे मिल्खासिंग म्हणून ओळखले जाते. त्यांना धावण्याची इतकी प्रचंड आवड आहे की ते आज वयाच्या 81 व्या वर्षीसुद्धा नियमितरित्या ऊन, वारा, पाऊस याची कसलीही पर्वा न करता धावण्याची प्रॅक्टिस करतात. त्यांनी आजपावेतो विविध राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होवून प्राविण्य प्राप्त केले आहे.

मुन्नालालजी यादव यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी कुस्ती खेळ प्रकारातून आपल्या करीअरची सुरुवात केली. त्याचबरोबर ते नियमीत रनिंगची देखील प्रक्टीस करीत होते. त्यांनी विविध रनिंग स्पर्धेत भाग घेवून पदक प्राप्त केलेत. तेव्हा पासून ते विविध रनिंग/ मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होत आहेत.

दिनांक 26 ते 27 जून 2023 रोजी उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे संपन्न झालेल्या मास्टर मॅराथॉन स्पर्धेत श्री. मुन्नालालजी यादव यांनी महाराष्ट्र राज्य तर्फे भाग घेवून सदर स्पर्धेमध्ये 100 मी.,200 मी, व 5 किलो मिटर, इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून 3 सुवर्ण पदके (गोल्ड मेडल) जिंकून त्यांनी संपूर्ण भारत देशाचा, महाराष्ट्र राज्याचा आणि विशेष म्हणजे गोंदिया जिल्हयाचा, नाव लौकीक केलेला आहे. त्यांच्या उत्तम कार्याची पावती म्हणून दुबई येथे ऑक्टोबर 2023 महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैराथान स्पर्धेत त्यांची निवड करण्यात आलेली असुन ते सदर स्पर्धेकरीता नियमित सराव करीत आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात आला आहे. सदर बाब गोंदिया जिल्हासाठी अभिमानाची व गौरवाची असून नागरीकांकरीता विशेषतः तरुण पिढी करीता ते प्रेरणास्त्रोत बनले आहेत.

त्याच प्रमाणे विशेष बाब म्हणजे दिनांक – 15 नोव्हेंबर 2022 रोजी विर बिरसा मुंडा जयंती निमीत्त गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे क्रिडा संकुल गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या रन- फॉर-नॉन-व्हाइलेन्स मॅराथॉन स्पर्धेत देखील त्यांनी 3 कि.मी. इन्व्हेंट मध्ये सहभागी होवुन प्राविण्य प्राप्त केले होते ..

error: Content is protected !!