Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

मणिपूर घटनेमधील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची युवक काँग्रेसची मागणी, तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतीला निवेदन

मणिपूर घटनेमधील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची युवक काँग्रेसची मागणी, तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतीला निवेदन

सडक अर्जुनी – 26/07/23– आपल्या देशाला हादरून टाकेल एवढी वाईट घटना मणिपूर या राज्यामध्ये घडली. परंतु घटना घडल्यानंतर काही दिवसांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एक संतापाची लाट जनसामान्यांमध्ये उमटताना दिसत आहे.

याच मागणीला घेऊन अर्जुनी मोर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपती यांना तहसीलदार सडक अर्जुनी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे उपाअध्यक्ष निशांत राऊत, अर्जुनी मोर विधानसभा अध्यक्ष रेहान शेख, विधानसभा महासचिव स्वप्निल ब्राह्मणकर, महासचिव विरू गौर, महासचिव निखिल कोटांगले, महेश सोनवणे, संतोष भंडारी, ललित खोटेले ,निलेश लाडे, मंगेश मोहुरले, हर्षद शेलोकर, राजन मेश्राम, राहुल बारसागडे, अमोल भंडारी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!