Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी- सौंदड येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मारक सभामंडप बांधकामाचे भुमीपूजन

सडक अर्जुनी : भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या स्थानिक निधीतून मंजूर ग्राम सौंदड ता. सडक अर्जुनी येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मारक सभामंडप बांधकामाचे भुमीपूजन ( 29 जुलै ) उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सूनील मेंढे, राजकुमार बडोले माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य, सडक/अर्जुनी पंचायत समितीचे सभापती संगीताताई खोब्रागडे, उपसभापती शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्या निशाताई तोडासे, पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे, सरपंच ग्रामपंचायत सौंदड हर्ष मोदी.

पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये, सदू विठ्ठले जिल्हाध्यक्ष माळी महासंघ गोंदिया, शरद विठ्ठले, रूपालीताई टेंभुर्णे माजी जिल्हा परिषद सदस्य, सोविंदा निर्वाण माळी महासंघ समाज सौंदळ, मंजुताई डोंगरवार माझी पंचायत समिती सदस्य, भाऊराव यावलकर उपसरपंच सौंदड, शुभम जनबंधू ग्रा. प. सौंदड, खुशाल ब्राह्मणकर, रंजनाताई भोई, प्रमिलाताई निर्वाण, अर्चनाताई चंने, रेखाताई राऊत, योगेश्वरीताई निर्वाण, संदीप मोदी, चरणदास शहारे, मदनजी साखरे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!