Monday, May 12, 2025
अर्जुनी मोरगोंदिया

कोतवाल भरती परीक्षेत झाला घोळ!!? , परीक्षा रद्द करन्याची मागणी 

अर्जुनी मोरगाव- कोतवाल भरतीसाठी लेखी परीक्षा रविवारी दिनांक 30 जुलै रोजी घेण्यात आली. या परीक्षेत सेटिंग झाल्याचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे परीक्षेत घोळ झाल्याची लेखी तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी लगेच कारवाई करत सोमवारी 31 जुलै रोजी एस.डि .ओ. यांना गोंदियाला येण्यास सांगितले. त्यामुळे रविवारी घोषित होणारा निकाल लांबणीवर गेला आहे.

अर्जुनी मोरगाव उपविभागात कोतवालाच्या 17 जागांसाठी 477 परिक्ष्यार्थी यांनी रविवारी लेखी परीक्षा दिली. त्यात अर्जुनी मोर तालुक्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल तर तर सडक अर्जुनी तालुक्यासाठी सरस्वती विद्यालय येथे परीक्षा केंद्र घेण्यात आले. परीक्षेची वेळ सकाळी 11:30 वाजता निर्धारित करण्यात आली होती. मात्र चक्क 12:00 वाजता पेपर सुरू करण्यात आला. परीक्षार्थींनी पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास पूर्वी हजर राहावे अशी सूचना होती .मात्र पेपर उशिरा सुरू झाला असतानाही उशिरा आलेल्या परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला .

 वायरल फोटो  -हीच कॉपी देल्याची चर्चा ,चौकशीची मागणी
वायरल फोटो -हीच कॉपी देल्याची चर्चा ,चौकशीची मागणी

जिल्हा परिषद हायस्कूल या केंद्रावर खोली क्रमांक 9 मध्ये कुणीतरी एका अनोळखी कर्मचाऱ्यांनी परीक्षार्थीला उत्तराची कापी आणून दिली. अगदी थोड्याच वेळात ही कॉपी वर्गात उपस्थित कर्मचाऱ्यांनी पकडून खिडकीबाहेर फेकली या परीक्षार्थी चा पेपर हिसकावून न घेतल्याने त्याने पूर्ण पेपर दिला. व ही बातमी सर्वत्र पसरली .काही परीक्षार्थी एकत्र आले व खिडकीबाहेर फेकलेली कॉपी त्यांनी शोधून काढली. त्या कॉपीत कोतवाल भरतीच्या संबंधातले विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे होती.


“परीक्षेत जो काही घोळ झाला असेल त्याची चौकशी करू सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावले आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेऊ”     उपविभागीय अधिकारी वरून शहारे 


परीक्षा रद्द करण्यात यावी

परीक्षेत घोळ झाल्याची परीक्षार्थींनी अगदी का लक्षात घेतला ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्या परीक्षा झालेल्या घोळाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करा .अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर शिवसेनेचे सैलेश जायसवाल आणि संजय पवार यांनी केली आहे.

error: Content is protected !!