Tuesday, May 13, 2025
अर्जुनी मोर

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी जाणुन घेतल्या जनता व शेतक-यांच्या समस्या

अर्जुनी मोर. :- भाजपाचे जेष्ठ नेते व माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील अर्जुनी मोर. तालुक्यातील ताडगाव , बोळदे / करड,व धाबेटेकडी/आदर्श या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते व जनता तसेच शेतकरी बांधवांसी ( ता.16 ) संपर्क साधून विविध विषयांवर चर्चा केली.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भारतिय जनता पार्टीचा जनाधार मजबूत करण्यासाठी विविध गावांमध्ये भेटीगाठी सुरु केल्या आहेत.ताडगाव /अर्जुनी मोर.येथील भाजपाचे जेष्ठ नेते रुपचंद नाकाडे यांचे निवासस्थानी जावुन त्यांच्या तब्येतीविषयी आस्थेने विचारपूस केली.

व आजार लवकर बरा होवो असी कामना केली. त्यानंतर धाबेटेकडी/आदर्श येथील पंचायत समिती सदस्य नुतन सोनवाने यांचे आईचे निधन झाल्याने माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी त्यांचे कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच बोळदे /करड, येथे भाजपचे कार्यकर्ते गुलाबराव लंजे यांचे निवासस्थानी विविध कार्यकर्ते यांची भेट घेवुन विविध विषयांवर चर्चा केली. यामधे प्रामुख्याने शेतकरी हितांच्या योजना संदर्भात विशेष चर्चा करून जनतेला भेडसावत असणा-या समस्यांवर सुध्दा चर्चा करण्यात आली.

यावेळी जनता शेतकरी यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार शेतक-यांसाठी राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहीती दिली.तसेच भाजपाच्या पेजप्रमुख व बुथप्रमुखांनी भाजपा मजबुतीसाठी कशोसीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते.

महामंत्री लैलेश्वर शिवनकर,लक्ष्मीकांत धानगाये,राजहंस ढोके,व्यंकट खोब्रागडे,गुलाबराव लंजे, बोळदे चे सरपंच बन्सिधर लंजे. पंचायत समिती सदस्य नुतन सोनवाने,सुरेश लंजे, नितीन नाकाडे, मिनाबाई शहारे,ईश्वर खोब्रागडे;नरेश खोब्रागडे तथा जनता व शेतकरी बंधु उपस्थित होते.

error: Content is protected !!