Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

दोडके जांभळी येथे वन्य प्राण्यांचे हैदोषामुळे धान पिकाचे नुकसान ! राजकुमार बडोले यांनी शेतात जाहुन केली नुकसानीची पाहणी

सडक अर्जुनी – सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी दोडके हा परिसर जंगल व्याप्त असल्याने वन्य प्राण्यांच्या हैदोषामुळे खरीप हंगामातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार वन विभागाचे अधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी केली. ही बाब माजी मंत्री राजकुमार बडोले यांना मिळतात त्यांची दखल घेत 26 ऑगस्ट रोजी जांभळी दोडके या गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसान संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कशाप्रकारे वाचवता येईल याविषयी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.

शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला तसेच झालेल्या नुकसान भरपाईसाठी आपण पाठपुरावा करणार अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली .
सविस्तर असे की सडक अर्जुनी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून वनसंपदेने नटलेला तालुका आहे.

तालुक्यातील गावे जंगलाला लागून आहेत त्यातच नागझिरा अभयारण्य याच तालुक्यातील काही गावालगत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर गावालगतच्या शेतामध्ये होत असतो. यावर्षीच्या खरीप हंगामात जांभळी दोडके या गावातील शेतकऱ्यांचे धान पिकाचे नुकसान रानगवे मोठ्या प्रमाणात करीत आहेत. शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतावरच राखणी करावी लागते .

याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. रानगव्यांनी शेतात घुसून शेतकऱ्यांच्या ध्यान पिकाच्या नुकसानीसाठी जणू सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .याच्या आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असून आर्थिक अडचणीला समोर जावे लागेल. अशी अडचण आणि परिस्थिती निर्माण झाली. ही माहिती माजी मंत्री राजकुमार पडले यांना कळताच लगेच ते दिनांक 26 आगस्ट – शनिवार रोजी प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकरी व तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा घडवून आणून काय उपाययोजना करता येईल याविषयी जिल्ह्याचे उपवन रक्षक यांच्याशी सुद्धा भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून शेतकऱ्यांचे अडचणी सांगितल्या आणि याविषयी काय उपाययोजना करता येइल यावर चर्चा केल्या. वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील जंगल व्याप्त परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असे चित्र सध्या तालुक्यात मिळते.

माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत शेतावर प्रत्यक्ष पाहणी करिता जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भुमेश्वर पटले, पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते ,माजी पंचायत समिती उपसभापती राजेश कठाने , डॉक्टर सुशील लाडे , पत्रकार बिरला गणवीर , सरपंच सोनवाणे व वन विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!