कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक हरिष बन्सोड भाजप सोडून आता काँग्रेस मध्ये प्रवेश
सडक अर्जुनी – सडक अर्जुनी कृषि उत्पन्न बाजार समितिचे संचालक हरिष बन्सोड यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, मुंबईच्या प्रदेश कार्यालयात कांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश महासचिव देवानंद पवार उपस्थित होते.
हरिष बन्सोड यांनी 6 मार्च 2023 रोजी अर्जुनी मोरगाव येथे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात भाजप पक्षा मध्ये प्रवेश केला होता. आता हरिष बन्सोड यांनी नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
प्रसंगी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रोशन बडोले, सामाजिक कार्यकर्ते शंकर मेंढे, चिखली ग्रामपंचायत चे माजी सरपंच सुधाकर कुर्वे, सुमेध बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते.