Monday, August 25, 2025
गोंदिया

डॉ.सुशिल लाडे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद ( NITI आयोग प्रमाणीत ) जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

डॉ. सुशिल लाडे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद ( NITI आयोग प्रमाणीत ) गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

गोंदिया, पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते,  सामाजिक चळवळीतील खंबीर कार्यकर्ते तसेच अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्ये करणारे डॉ. सुशिल लाडे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद.  ( NITI आयोग प्रमाणीत,) जिल्हाध्यक्ष गोंदिया पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक कार्ये, आणि पत्रकारिता क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणे. पत्रकारितेच्या माध्यमातून जन माणसाच्या समस्या शासन दरबारी मांडून लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्ये अनेक वर्षा पासून करत आहेत . त्यांनी मानवाधिकार , RTI, ग्राहक जागरूकता ,बाबतचा प्रसार, व प्रचार,जनजागृती करणे हे त्यांचे सतत चे कार्ये प्रेरणादायी म्हणावे लागेल. मानव समाजाच्या अडी अडचणींना आपल्या अडचणी समजून त्या सोडविण्यास प्राधान्ये देणे, कोरोना महामारीच्या काळात कोरोणा बाबत जनजागृती करणे,

आपल्या संघटने द्वारे कोरोणा योद्धांचा सत्कार करणे अशा अनेक त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद  (IHRJPC, Reg.No. 114/2020 ( NITI आयोग Certified ) / Reg. by. Government Of India ). क्षेत्रीय कार्यालय
0/47, विनोहापुरी, लाजपत नगर, नई दिल्ली – 110 024 , द्वारे

डॉ. सुशिल लाडे
डॉ. सुशिल लाडे

राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रजित सिंह, राष्ट्रीय मुख्य महा सचिव हौशिला प्रसाद दुबे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष कुलदीप सिंह,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख रशीद रहीमान,शब्बीर बेग ,प्रदेश कार्याध्यक्ष,सुधीर बोरगावकर,प्रदेश महासचिव , इत्यादी मान्यवरांनी डॉ. सुशिल लाडे यांची नियुक्ती गोंदिया जिल्हा अध्यक्ष पदी केली आहे.
डॉ. सुशील लाडे यांच्या नियुक्तीने महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन व्यक्त केले. तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा अभिनंदन व्यक्त केले.

error: Content is protected !!