सडक अर्जुनी येथे दोन अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाही
सडक अर्जुनी येथे दोन अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाही
सडक अर्जुनी – 2/9/23- तहसील कार्यालय सडक अर्जुनी द्वारा मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार सध्या तरी तालुक्यात रेती घाट बंदच आहेत. कोणत्याही रेती घाटाचे लिलाव करण्यात आले नाही.
आज दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळ च्या सुमारास उपविभागीय अधिकारी व्ही. शाहारे अर्जुनी मोरगाव हे सडक अर्जुनी ला दौऱ्यावर आले असता त्यांनी सडक अर्जुनी तहसील कार्यालय च्या हद्दीत येणाऱ्या दोन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वर कारवाही केली.
कोहळीतोला येथे एका ट्रॅक्टर मध्ये 1 ब्राश अवैध रेती वाहतूक करताना आधळले असता त्यांना विचारपूस केली असता त्यांच्याकडे रेती वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता . त्यात वाहन चालक जयलाल फुलचंद म्हरस्कोल्हे व वाहन मालक : वामन आनंदराव खोटेले दोन्ही राहणार कोहळी टोला गाडी क्रमांक (MH 35 G 2492, ट्रॉली क्रमांक नाही.) त. सा. क्र. 9 मध्ये सदर कारवाही करण्यात आली. त्यांचे वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या बाबत दुसरी कारवाही वाहन चालक : रवींद्र हरिदास इरले,
वाहन मालक : राजेंद्र हरिश्चंद्र भेंडारकर, दोन्ही राहणार सौंदड यांच्या विरुद्ध राका येथे कारवाही करण्यात आली . ( गाडी क्रमांक MH -35 AG-8513, ट्रॉली क्रमांक MH- 35-F4256 ) आहे. यांचे सुद्धा ट्रॅक्टर तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे जमा करण्यात आले.
तहसीलदार निलेश काळे यांनी दिलेल्या माहिती नुसार एका ट्रॅक्टर वर 1 लाख 25 हजार रुपये दंड आकारला जातो. सदर कारवाहीची चौकशी सध्या सुरू आहे.