Tuesday, May 13, 2025
क्राइमसड़क अर्जुनी

सडक अर्जुनी- 5 जिवंत सारस पक्ष्याची तस्करी करणारे 5 इसम वण विभागाच्या ताब्यात

महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव जिल्हा गोंदिया यांची पेट्रोलिंग दरम्यान सारस या दुर्मिळ विदेशी पक्षाची तस्करी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याची उल्लेखनीय कामगिरी

सडक अर्जुनी – 13/9/23- महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव जिल्हा गोंदिया येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुमार लील्हारे, पोलीस नायक बनोठे, पोलीस शिपाई अली , हे दिनांक 12/ 9/2023 रोजी शासकीय वाहनाने महामार्ग क्रमांक 53 वर गस्त करीत असताना सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बामणी येथे संसायास्पद रित्या दिसून आलेले दोन वाहन (१) टोयाटा इनोव्हा क्रमांक GJ 05 -JB 7737, (२) सुझुकी ब्रेजा GJ 05- RE 7430 ची तपासणी केली असता ईनोव्हा वाहनांमध्ये दोन इसम दिसून आले व कारच्या मागील बाजूस पाच मोठे पक्षी दिसून आले.

वाहन चालक व त्यांच्या बाजूस बसलेल्या वेक्तिश विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव (१)समीर शाकीर मंसुरी व 29 वर्ष आणि (२) हजरुद्दीन गुलाबमोयुद्दिन मौलवी वय २५ वर्ष दोन्ही राहणार सुरत राज्य गुजरात असे सांगितले.

तसेच त्याचेसोबत असलेले वाहन क्रमांक GJ 05 RE-7430 मधील असलेले व्यक्तींची नाव (१) मुसा शेख वय 24 वर्ष,(२) शाहजाद शेख शकील वय 29 वर्ष , (३) पठाण हुसेन गुलाम शाबीर वय 19 वर्ष, तिन्ही राहणार भिंडीबाजार ,सुरत राज्य गुजरात असे सांगितले.

वरील पाचही व्यक्तींची चौकशी केल्यावर ते कलकत्ता ते मुंबईला जात असल्याचे सांगितले .

तसेच वाहन क्रमांक GJ 05- JB7737 या कारच्या मागील बाजूस असलेल्या पक्ष्यांची बारकाईने पाहणी केली असता पक्षी हे दुर्मिळ पक्षी आहेत असे वाटल्याने त्या पाचही इसमांना पक्षीचे नाव विचारले वर हे कॉमन क्रेन (सारस प्रजाती) असल्याचे सांगितले.
तरी वरील पाचही इसम हे त्यांचे ताब्यातील वाहन क्रमांक GJ05-JB 7737 आणि GJ 05- RE 7430 मध्ये वन्यजीव दृष्ट्या संरक्षित व दुर्मिळ असलेले कॉमन क्रेन( सारस पक्षी) गैरमार्गाने बेकायदेशीर वाहतूक करून तस्करी करीत असल्याने योग्य कायदेशीर कारवाई करून नमूद दोन्ही वाहने आणि पाचही इसम यांना ताब्यात घेतले.
तसेच पाचही जिवंत असलेले दुर्मिळ कॉमन क्रेन पक्षांना ताब्यात घेऊन पक्षांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन्य विभागाचे राऊंड ऑफिसर वाढई व त्यांचे स्टॉप यांना बोलावून घेऊन प्रकरणाची माहिती दिली.
पक्षी हे दुर्मिळ असल्याने वन विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी गडवे तसेच स्वयंसेवी संस्था सेवा चे डायरेक्टर सावन बहेकार हे त्याची स्टॉप ला सुद्धा बोलावण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई करिता नमूद दोन्ही वाहने आणि पाचही इसम तसेच पाच जिवंत दुर्मिळ सारस पक्ष्यांना वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गडवे व राऊंड ऑफिसर वाढई व त्यांच्या स्टॉप च्या ताब्यात देण्यात आले.

पुढील कायदेशीर कारवाई वण विभाग करीत आहेत .
सदरची उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव जिल्हा पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक जोकार , पोलीस उपनिरीक्षक लिल्हारे, पोलीस नाईक बनोठे, पोलीस शिपाई अली, पोलीस शिपाई वचाने , सहायक फौजदार भुरे ,पोलीस नायक नेरकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!