Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी येथील अपघातात एक व्यक्ती ठार तर एक जखमी

सडक अर्जुनी – 14/9/23- गोंदिया ते कोहमारा मार्गावरील सडक अर्जुनी येथे पोस्ट ऑफिसच्या समोर दिनांक 13/9/23 रोजी बुधवारला सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान मोटार सायकल आणि ट्रॅक्टर च्या धडकेत एक व्यक्ती ठार तर एक गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सडक अर्जुनी येथे कोहमारा ते गोंदिया कडे जाणारा डांबरी रोडवर (पोस्ट ऑफिसच्या समोर ) निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH 35 G -7995 चा चालक हा कोहमारा ते गोंदिया कडे जाणारा डांबरी रोड ने जात असतानी ट्रॅक्टर चालकांनी आपल्या ताब्यातील वाहन भरगाव वेगाने व हयगतीने चालवून समोरून येणारे दिनेश किसन हत्तीमारे वय 25 वर्षे आणि साहिल जागेश्वर शिवणकर वय 17 वर्षे हे दोन्ही राहणार चिखली तालुका सडक अर्जुनी येथील आहेत. यांचे फॅशन प्रो हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH 35 AB 5034 ला धडक दिल्याने दिनेश किसन हत्तीमारे वय 25 वर्षे हे रुग्णालयात नेत असताना मरण पावले.

तर साहिल जागेश्र्वर शिवणकर वय 17 हे गंभीर रित्या जखमी झाले . फिर्यादी लोकेश मोरेश्वर भेंडारकर व 49 वर्ष राहणार चिखली तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन डूग्गीपार येथे अप क्र. 336/2023 कलम 279, 337, 304 अ भादवी सह कलम 184 मोवाका गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रेणी पो.उपनी. इलमे पोलीस स्टेशन डूग्गिपार हे करीत आहेत.

error: Content is protected !!