Monday, May 12, 2025
गोरेगांव

आमदार चंद्रिकापुरे यांनी गोरेगांव तालुक्यातील गावांना भेटी दिल्या आणि ऐकल्या समस्या 

गोरेगांव – MKM NEWS 24- गोरेगांव तालुक्यातील मुरदोली, पलखेडा, तेलंगखेडी, पालेवाडा या गावांत दिनांक २२ सप्टेंबर शुक्रवार रोजी अर्जुनी मोरगाव मदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दौरा केला व ग्रामस्थांची बैठक करून त्यांचे समस्या ऐकल्या. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी ग्रामस्थांनी आमदारांना पिण्याचे पाणी, संजय गांधी निराधार, रस्ते, सोलर वॉटर टॉवर, सभामंडप दुरुस्ती, रेशनकार्ड, इलेक्ट्रिक डीपी आदी समस्यांची माहिती दिली. लवकरच प्रत्येक समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन आमदारांनी ग्रामस्थांना दिले. ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे हे माझे प्राधान्य असल्याचे आमदार म्हणाले. अर्जुनी मोरगाव मतदारसंघाच्या विकासाला वेग आला आहे. प्रत्येक गावात विकासाची गंगा वाहणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सरपंच पुष्पा टेकाम मुरदोली , उपसरपंच ममता गदवार, मोनिका डाहारे सरपंच पालेवाडा, उपसरपंच लीलेश्वर बहेकार, रवींद्र बहेकार उपसरपंच तेलंगखेडी, बाबा बहेकार, जितेंद्र भोंडेकर, योगराज फुंडे, गुणीराम खरोले, नरेश बहेकार ,प्रशांत बहेकार, दिनेश बहेकार, हरिचंद्र धुर्वे, शिवपाल टेकाम व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!